Jump to content

पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 लोकसाहित्याचे एक मौलिक अंग म्हणून विविध लोककलांचा विचार आपल्याला करता येईल. लोकवाद्ये, लोकनृत्ये, लोकश्रध्दा, यांचा समावेश यात करता येतो. समाजाचे राहणीमान, जीवनमान यांचा तपशीलवार विचार या आधारे करता येतो.

 'मांदोळ नाच, काज, थाळगान, बोहाडा, लगीनगीत, गौरीगीत, भोंडल्या नि टिपऱ्यांचा नाच, मर्तिक नाच, तोरण बसवणं, डोंगरच्या मावल्या, डाका, तारपा, ढोलनाच, हस्तकला, चित्रकला या साऱ्यांचा समावेश या लोककला विचारात होतो.

 चित्रकलेचे उदाहरण घ्यायचे झाले तर गाईच्या शेणाने सारवलेल्या,कुडाच्या लिंपलेल्या भिंती असलेल्या झोपड्यांवर तांदळाच्या पीठाने चित्रकला रेखाटलेली आढळते. आज रंग रेखांचे सामर्थ्य दर्शवणारी ही “वारली पेंटींग्ज" या कलेतील 'वास्तवा' मुळेच आंतरराष्ट्रीय गौरव आणि कीर्तीची बाब झालेली आहे. .  बांबूच्या घायपाताच्या विणलेल्या टोपल्या, टोप्यातून आणि सुपल्या चटयांतून हस्तकला साकारलेली दिसते. त्यातही सूक्ष्मता आणि सौंदर्य आहे. परंपरेने ठेवा म्हणून दिलेले हातचलाखीचे काही खेळ आहेत. कुटे, प्रहेलिका किंवा कोडी आहेत.नृत्यातील कसरती आणि सर्कशी आहेत. '

थाळगान : थाळगान' ही तर गरीबांची कमखर्ची उत्तम कला आहे. त्याला सामग्री आहे, फक्त एक काशाचा थाळा (पात्र) सागाची काडी, मेणाचा छोट्या आकाराचा गोळा आणि तालासुरात कथा लोककथा सांगणारा कथेकरी. बस्स एवढेच पुरे:तो कथेकरी काशाचा थाळा मांडीवर देतो. थाळ्याच्या मध्यभागी मेण लावून, ' त्यात सागाची काडी खोवतो आणि काडीच्या वरपासून खालपर्यंत दोन्ही हाताची बोटे अनुक्रमे खाली आणतो. त्याबोटांचा हळुवार स्पर्श, थाळ्याचा आणि काडीचा

विशिष्ट कंपातून निघणारा सुस्वरातील आवाज, त्या आवाजाच्या धुंदीत एका · नादमयतेने रात्रभर कथेकरी कथा लावतो,जागवितो. '

४३