Jump to content

पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

'...अरदडा त नयी भरती गरदडा',
'...हाती त करिल अन्नाची माती'

आदिवासींची खास परिभाषाही लक्षात घेण्याजोगी आहे. आदिवासी पूर्व दिशेला 'उगवती', तर पश्चिम दिशेला 'मावळती' म्हणतो. 'बहिरोबा' म्हणजे 'बहिरोबा देव जिकडे आहे ती', उत्तर दिशा, तर दक्षिणेला म्हणतो. 'बैलविक्या', म्हणजे बैलांचा बाजार भरतो, ती दिशा. 'घरोंदा' म्हणजे घरजावई आणि 'मेढिगा' म्हणजे लग्न लावणारी अशी ही परिभाषा आहे. गरोदर स्त्रीला 'दोन जीवी' म्हणतात.

९. आदिवासींच्या लोककलेत समाविष्ट होणाऱ्या काही त्यांच्या समजुती श्रध्दा. आपण सांगू शकाल का ? आदिवासींचे काही आडाखे-समजूती मोठ्या लक्षात घेण्याजोग्या आहेत. · मुंग्या आपली अंडी वर घेऊन चालल्या की समजावे भरपूर पाऊस यंदा पड़ेल. कारण त्या मुंग्या आपली अंडी सुरक्षित जागी घालतातं.

कावळ्याने आपला घरटा शेंड्यावर बांधला तर समजावे की यंदा वारा पाऊसपाणी कमी आहे. झाडाच्या मध्यावर घरटा बांधला तर मग पाऊस, वारा, वावधान यंदा जास्तीचा आहे असं समजांव. जमीनीत, कीडे, कीटक झाले, पिंपळाचं झाड हिरवं गर्द झालं, गुलमोहर आगी सारखा फुलला, पळसाला केसरी रंगाची फुल .... आली म्हणजे मग पावसाळा सुरू होणार असं समजावं.
 सोमवार हा गोडा दिवस, म्हणजे शाकाहारी, मंगळवार हा मोडा दिवस म्हणज सुटीचा, कारण तो देवीचा वार आहे. वारूळाच्या वरच्या भागातील कंगोऱ्यावरुन होकायंत्राप्रमाणं आदिवासी उत्तर दक्षिण दिशा ओळखतो. अशा काही .. आदिवासींच्या लक्षात घेण्याजोग्या, अभ्यासनीय समजुती, अडाणी समजुतीचा उदाहरणे द्यायची झाली तर 'गरोदर बाईला मृत्यू आला तर तिच्या पोटात भात . भरतात.' अशाही काही त्यांच्या भयंकर समजुती आहेत.

(प्राचार्य डॉ. गिरधारी यांची डॉ. माधवं पोतदार यांनी घेतलेली मुलाखत)

४१