'होली जळाली न थंडी पळाली.'
'पोट हाय संगात काय पडल मांग'
'ये ना मये न ....घमेल घेऊन पये'
आता काही उखाणे पहा :
'आरवत कोंबडा, तरंगत जाय ... चार शिंग आठ पाय ...'
(म्हणजे नांगर यात शेतकरी, २ बैल, ४ शिंग, ८ पाय असे नांगरधारी शेतकऱ्यांचे चित्रण आलं आहे.)
'सुकेतळ्या.... पाखरे फडफडती'(म्हणजे लाह्या भाजणे)
'काळीगाय काटे खाय,पाण्याला पाहून उभी हाय...'(म्हणजे वहाण - चप्पल)
'तल्याच्या काठी, ठोकली खिटी,हालते पण उपटतच नाही' (हात आणि बोट)
'काळी काठी तेल चाटी' (केस)
असे हे उखाणे आहेत.
८. आदिवासींचे'महिने - नक्षत्र' या संदर्भातील हा वाकप्रचार आडाखे आहेत का?
होय ! आदिवासी आपली दुःख कधी सांगत नाही ती जाणून घ्यावी लागतात. त्यांचे मराठी महिने आणि नक्षत्र यांच्याबद्दल साहित्य संग्रहित करता येईल ते आवश्यक आहे. त्यात ती दुःख साठवलेली आहेत.
काही नमुने पाहा-
'जेठ अन पाण्याची भेट','भादवा अन हांडी मडकी वाजवा'.'पुस करी हुस' 'माही बीजा, कोंबडी शिजा-' पोशा पोशांनो उगाच निजा, चैत म्हणजे दैत.
...पाणी आबादाणी...शेतकऱ्याला सोन्यावाणी
पडल उतरा त हाल खाईना कुतरा किंवा भात खाई ना कुतरा
'....स्वाती त पिकती मोती'
'पडल्या मघा नाही त वरती बघा'