पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६. कवळी भाजी सण - म्हणजे सगळे परिवारातील मिळून कवळी भाजी शिजवून एकत्रितपणे खातात आणि तिथून ती भाजी खायला सुरुवात होते. ६. अक्षय्य तृतीयाला ७ दिवस गाणी गातात. सासरी गेलेली गौर ७ . दिवसासाठी माहेरी येते. म्हणून ही आनंदगीतं गातात. ८ व्या दिवशी ती सासरला जाते. याला ते आखातिजा म्हणतात. ..७. घटस्थापना - १८ धन पेरतात. ती डोक्यावर घेऊन नाचतात. अशा अनेक सण उत्सवांचे लोककलात उल्लेख करता येतील. ७. आदिवासी लोककलांमध्ये रुढ असलेल्या काही म्हणी उखाणे, वाकप्रचार, रुढ कल्पना तुम्ही सांगू शकाल काय ? . . आदिवासींमधील म्हणी या नुसत्याच म्हणी नाहीत तर त्या अत्यंत महत्त्वाच्या .. आहेत. आजच्या पर्यावरण शास्त्रज्ञाला त्या म्हणींतून अनेक सत्य गवसतील. उदाहरणार्थ - 'झाड तठ वारा ... पडती पाण्याच्या धारा -' 'जळो, पण पिको -' (सीता माईला रावण उचलून नेतो तेव्हा सोडवलं नाही म्हणून हा शाप. मग ती उःशाप देते ती कथा) 'तण- खाई धन' 'वावरात पिकू दे, आमचं पोट भरु दे-'...... 'माय माझी-तू, घरात सोन पडू दे.' . अशा अनेक उद्बोधक म्हणी आहेत. त्याचप्रमाणे - . . . . . . 'मडक्यात दाणा तर भील. उताणा.' ................ , . 'फडका घे- मडका घे.... सूट' (सूडका घे?) एक फडकं आणि एक मडकं एवढीच खरी जगण्यासाठी माणसाला गरजेचे असते तेवढे पुरते.. . ......... 'निलाजऱ्याला मारला पिढा त म्हणे मला बसाय दिला' 'शान्याला शब्द अन मूर्खाला टेंभूळ' (म्हणजे काठी) . . 'लाज मरे तो, भुखे मरे'