पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निसर्गाच्या सानिध्यात, दऱ्याखोऱ्यात, नागर भागापासून अलिप्त जीवन जगणारे वनवासी बांधव अद्यापही लोककलानंद नृत्यातून, गाण्यातून, सणवारातून, पारंपारिक विविध प्रथांमधून उपभोगतात आणिं जागवतात. याचे कारण आधुनिक आशा आकांक्षा आणि तथाकथित नव्या सुधारणांच्या कोशात अजूनही ते फारसे गुरफटलेले नाहीत. लोकगीत हा त्यांचा फार मोठा आनंद ठेवा आहे तो आदिवासींनी शतकानुशतक परंपरेनं जतन करुन ठेवलेला आहे. अर्थातच मौखिक स्वरूपात, लिखित नव्हे या लोकगीतातून स्त्री पुरुष प्रेमाची अभिव्यक्ती आनंदाच्या आत्यंतिक प्राप्तिसाठी होत असते.

 विदर्भातील कोलाम लोकगीतातील एक तरुण अगदी खुल्या दिलाने आपल्या तरुण मैत्रिणीला म्हणतो -

 सखे ! तू बाजारात चल, मी माझ्याजवळचे सगळे पैसे खर्च करुन तुला हवे ते घेऊन देतो. चोळी, बांगड्या काहीही माग ! मागशील ते घेऊन द्यायला मी तयार आहे. या गीतांत अनेक भेटवस्तूंची नावं घालून ते लोकगीत रंगत जाते. डफ किंवा पावा या जोडवाद्यांच्या तालावर एक नवयुवक हे प्रेमगीत गातो आणि प्रेयसी नवतरूणी आणि इतर तरूण त्या गीताची साथ करून त्या नृत्यात रंगून जातात.
'विडा मिळून खा क ऊ.....,'
'विडा मिळून खाक ऊ...असे बेभान होऊन म्हणतात. वनवासींची लोकगीत प्रामुख्यात त्यांच्या समूहाच्या कार्यक्रमात गायची असतात. त्यामुले त्यातली भावना आपोआप समूहरूपच बनते.

५. आदिवासींच्या लोकगीताबद्दल थोडं आणखी तपशीलात सांगा •
 वनवासींची लोकगीतं प्रामुख्याने बहुतेक सणवार आणि उत्सव असेल की नृत्य, गायन, वाहन याच्या तालासूरात पार पाडली जातात. लिंगभेद न मानता आदिवासी स्त्री पुरुष धुंद होऊन नाचतात, गातात. वनवासींची लोकगीतं त्यांच्या या बेहोषवृत्तीचा परिचय करुन देतात.

३७