पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निवडीच्यावस्तू भेट देऊन, शोक प्रकट करायचा. गरीबीत मातीचे का होईना पण पिंडदान करायचे. एकाच भगताच्या मार्गदर्शनानं हे काज साजरे होत. त्यात तलवारीनं डोक्यात जखम करून घेऊन एका दिवसात पुन्हा औषधी झाडपाला लावून ती बरी करण्याची व्यवस्था आहे. उध्वस्त कुटुंबांचे पुनर्वसन आहे विधवा स्त्री आणि विधुर बाप्या यांची लग्न बाईच्या पदरात अवघा एक रुपाया बांधून जुळवण्याचा प्रयत्न होतो.

३. आपण आम्हाला आदिवासी लोककलांबद्दल सद्यस्थिती कशी आहे ते सांगा?
 शासनापासून स्वयंसेवी संस्थांपर्यंत अनेक अंगांनी आदिवासींच्या विकासाचे कार्यक्रम राबविले जातात; पण आदिवासी लोककलांना बहर येईल, त्या सर्वत्र - मान्यता आणि प्रसिध्दी पावतील असा कार्यक्रम कोणी फारसा हाती घेतलेला दिसत नाही. आदिवासी भागात अद्याप सिनेमागृह पोहोचलेले नाही. जिथं टी. व्ही. नाही तिथं अजूनही चित्रपट ते पाहू शकलेले नाहीत.

 मधूनच आदिवासींचे मेळावे आयोजित केले जातात. त्या मेळाव्यात किंवा उत्सवात त्यांचे काही सांस्कृतिक कार्यक्रम शहरी भागात राबविले जातात. पण ते तेवढ्या पुरतंच होतं आणि राहतं ते. उत्सवात दाखवलेली कला, लोककला, म्हणून जतन व्हावी, तिला उत्तेजन मिळावे असा विचार होणे अगत्याचं आहे. जगभरातील आदिवासींची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्यात त्यांच्या लोकनृत्यांना महत्त्वपूर्ण स्थान आहे. आदिवासींचं यापूर्वी सांगितलेल्या प्रकारच्या नाच गाण्यावर बेहद्द प्रेम आहे. असे हे त्यांचे कष्टाळू तरीही संगीत नृत्यासह जीवन आहे.

४. आदिवासी नव्या काळातही त्या पारंपारिक लोककलात कसे रमतात ? त्यांना आधुनिकतेची ओढ नाही कां ?

 संस्कृतीचे अस्सल दर्शन घडविणारी कला म्हणजे लोककला लोकसाहित्याचेच ते एक अंग आहे. आदिवासी लोकसाहित्यातून या लोककलांतून आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडायला फार मोठी मदत होते. डोंगर कपारीत, वनपरिसरात,

३६