Jump to content

पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कथेकरी कथा जागवतो. ही कथा असते, श्रावण बाळाची, किंवा रामायणातली, नाहीतर महाभारतातली त्याला म्हणतात थाळगान ! हा गाणारा कथेकरी, मध्यभागी बसतो. भोवती गोलाकारात लोकांचा फड समुदाय जमतो आणि कथा रात्रभर रंगते. असे हे आहे अजब थाळगान एक लक्षवेधी आदिवासींची लोककला.

२. असेच आणखी काही आदिवासींचे तुम्ही पाहिलेले लोककला प्रकार सांगू शकाल का?
 काही ठराविक गावी विशिष्ट वर्षीच बोहाडा असतो. बोहाडा म्हणजे देवी जगदंबेचा उत्सव. या उत्सवात वेगवेगळी सोंग आणली जातात. त्यात मुखवटे तयार करतात आणि त्या सोंगानुसार नाचण्याची आणि वाद्ये वाजवण्याची एक विशिष्ट पध्दत, लय असते किंवा चाल असते. उदा. गणपती, बहिरोबा, हिरवा देव, अहिरावण, महिरावण, वेताळ, नृसिंह, दुदंभी, म्हसोबा,नारद, सारंगा, लक्ष्मी, गावदेवी, आणि शेवटी जगदंबा असी ही सोंगं रात्रभर जागतात. पाड्यापाड्यावरचे लोक तर्र जागून पाहतात. या निमित्तानं इथे यात्राचं भरते. दुकान खाऊ मिठाईची ! खेळण्याची हारीत लागतात. त्या नृत्यातली बेहोशी आणि धुंदी अविस्मरणीय असते. तारपा नाच ही असाच. त्यात एक काठ्या प्रमुख म्होरक्या असतो. तो धुंगराची काठी आपटतो. त्या तालासूरावर सारे नाचतात. साऱ्या मुलामुलींनी परस्परांच्या कमरेला विळखे घालून फेर धरुन ठेक्यात पावले आलटून पालटून नाचायचं असतं. तारपा वाजवणारा भरदार माणूस न कंटाळत गाल फुगवून जोमदारपणे रात्रभर तारपां वाजवतो. आणि त्या धुंदीत आदिवासी तहान, भूक, कष्ट दारिद्रय विसरून नाचतो. हे पाहून बौड रसेलसारखा तत्त्ववेत्ता एकदा म्हणाला माझे सगळे ग्रंथ आणि तत्त्वज्ञान मी आदिवासींना अर्पण करायला तयार आहे, पण फक्त बेहोषीचा, धुंदीचा तुमचाअनुभव आमच्या वाट्याला, माझ्या वाट्याला एकदाच येऊ देत... यात आदिवासींच्या कलेचे सारे मोल पुरेसे स्पष्ट प्रगट झाले आहे. काज हा आदिवासींचा असाच एक विधी. जशी आदिवासींच्या सामुदायिक विवाहाची योजना स्वयंसेवी संस्था गागोगाव करतात,तसंच परंपरेने आदिवासींनी आपले सामुदायिक श्राध्द घालणे, स्मृतिदिन साजरा करणे म्हणजे 'काज' यात वर्षभरातील मृत नातेवाईकांना जणू आवाहन करून अंगात येणाऱ्या वीरांच्या किंवा भगतांच्या मदतीनं मृताला त्याच्या आवडी

३५