१. आदिवासींच्या लोककलेत कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करता येईल ?
लोकसाहित्याचे एक मौलिक अंग म्हणून विविध आदिवासी लोककलांचा विचार करता येतो. त्याचप्रमाणे आदिवासींची लोकगीते, आदिवासींची नृत्यकला, आदिवासींच्या म्हणी, वाकप्रचार, समजुती, श्रध्दा, आदिवासींचे सणवार, राहणीमान-जीवनमान या साऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यांच्या तपशीलात आपण जेवढे शिरावं तेवढं थोडंच आहे. आदिवासींचा कांबड नाच, घांगळ भगत, म्हणजे घांगळी वाजवत करतात तो. मांदोळ नाच, थाळगान, बोहाडा, काज, लगीनगीत, गौरीगीत, मृत्युगीत, भोंडवायनी, टिपऱ्यांचा नाच, तोरण बसवणं, डोंगरच्या मावल्या, डाका, तारपा, ढोल नाच, हस्त कला, चित्रकला या साऱ्यांचा समावेश होतो.
चित्रकलेचं उदाहरण घ्यायचं झालं तर गाईच्या शेणानं सारंवलेल्या स्वच्छ आणि कुडाच्या लिपलेल्या भिंतीच्या झोपडीवर तांदळाच्या पीठानं आदिवासी आपली चित्रकला रेखाटतो. वारली पेटींग्ज म्हणून रेषांचं सामर्थ्य जाणलेली ही आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त झालेली चित्रकला ओळखली जाते. विदेशातही आज या कलेला मागणी आहे.
बांबूच्या घायपाताच्या विणलेल्या टोपल्या टोपल्यातून सुपल्या, चटयातून ही हस्तकला दिसून येते. त्यात पुन्हा हातचलाखीचे काही खेळही आहेत. कोडी आहेत. जस आदिवासींच्या ढोल नाचात किंवा कोणत्याही नृत्यात कसरती आणि सर्कसी आहेत.
थाळगान ही तर गरीबांची कमखर्ची उत्तम कला आहे. त्याला सामग्री आहे, फक्त एक काशाचे पात्र-थाळा, सागाची काडी मेण आणि एक कथेकरी लागतो, बस्स ! काशाचा थाळा मांडीवर घेऊन त्यात मध्यभागी मेण लावून त्यात तो कतेकरी सनकाडी रोवतो आणि वरपासून खालपर्यंत दोन्ही हातांची बोटं त्या कांडीवरुन क्रमाने फिरवीत कंपयुक्त सुस्वर काढतो आणि एकासूरात रात्रभर