ग्रामदेवता म्हणजे गावाच्या संरक्षक देवता होत. प्रामुख्याने त्या स्त्री स्वरूपात (दुर्गा, चामुंडा, यक्षिणी, यामाही, रेणुका इत्यादी) आढळतात. विशिष्ट काळ आणि अपेक्षित काम यांचा विचार करून ग्रामदेवतांची प्रतिमा निर्माण झाली असावी असे वाटते. स्त्री' त्वात निर्मिती व कलानिष्पतीची कल्पना असल्यामुळे ग्रामदेवते स्त्रीरूपात आढळतात.
आपण जमिनीला काळी आई म्हणतो. काळी म्हणजे काली जगदंबा म्हणून ग्रामदैवतेची रूपे गणली गेली जमिनीमध्ये पसाभर पेरले तर पाशेरी मिळते. हे निर्माण सामर्थ्य ग्रामदैवतांच्या मध्ये आढळते. म्हणूनच अवर्षण, पिकपाणी नाही, पिकांवर रोग, महामारीसारखी रोगराई आढळल्यास ग्रामदैवत कोपले असे मानण्याची प्रथा आहे. म्हणूनच ह्या देवता खेड्यातील लोकांना पूजनीय वाटतात. त्यासाठी नवस, पूजा, जत्रा, व्रत, मंत्रतंत्र बोलले जातात. या देवतांना पुढे देवघरातही स्थान मिळते. त्याच कुलदेवताही मानल्या जातात.
ग्रामदेवता गावाबाहेर पाषाण किंवा लाकडी खांबांच्या त्यात ओबडधोबड चौथऱ्याजवळ असतात. काही ठिकाणी डहाळ्यांचा मांडव पितळेची किंवा मातीची भांडी पाण्याने भरून त्यात कडूलिंबाच्या फांद्या खोचून ते उत्सवाचे स्थान बनवितात. या देवतेला रुईची फुले, जास्वंदीची फुले, कडूलिंबाच्या डाहाळ्या, ताडीमाडी, मध, आंग, गांजा, तंबाखू या वस्तू ग्रामदेवतेच्या पूजेच्या उपचारात वापरतात. आता नरबळी याऐवजी मांडवाला नारळ सांगतात.
तात्पर्य ग्रामदेवतेला आदिवासी गावात फार महत्त्वाचे स्थान असते. गावाचे ग्रामदेवतावाचून चालत नाही. आपत्तीच्या वेळी ग्रामदेवतेला शरण जावे याशिवाय पर्याय नसतो. ग्रामदेवतांचा, खेड्यातील लोकांचा-आदिवासींचा, जीवन मरणाशी संबंध असतो. म्हणून ग्रामदैवत त्यांचे जीवन सर्वस्व असते.