पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुसह्य करुन घेतलेलं असतं त्याला अन्य काही पर्यायच नसतो. यातूनच तो माणूस आपल्या सामाजिक परंपरा, उत्सव धार्मिकता निर्माण करीत असतो. यातूनच त्याच्या देवदेवतांना आकार प्राप्त झाला आहे. ग्रामदेवताचा विचार या संदर्भात आपल्याला करावा लागतो.

 प्रत्येक खेड्यात आणि पाड्यापाड्यात आपण गेलो की तिथे आपल्याला ज्याचं त्याचं ग्रामदैवत हमखास पूजिल जातं असं दिसतं अख्ख्या गावाचं ते दैवत असल्यानं सगळा गांव त्याला भजत असतो. पूजाअर्चा उत्सव करतो ग्रामदैवताची यात्राही भरवितो. ती एक मामुली गोष्ट असूनही त्याच्या दृष्टीने महत्त्वाची बनते.

 येरव्ही शहरी माणसं दिसतात तशी नसतात. त्याच्या लबाडी आणि स्वार्थी वृत्ती पेक्षा खेडवळ प्रांजळ माणूस आपल्याला परवडतो. त्याची नीतीमत्ता आणि आचरण चांगलं वाटतं. कारण तो पापभीरू असतो. शब्द पाळतो. कोणाचं दिलं घेतलेलं प्रामाणिक मनानं परत करतो. त्याला शब्द मोडणं आणि कोणाचं कर्ज बुडवून चोऱ्या करण मुळात माहितीच नाही. त्याला त्याची स्वतःची ओळखही नसते आणि नाव ही नसतं तरी तो एक समूह म्हणून जगत असतो.

 ग्रामदैवताचा धाक त्यानंच स्वतःला घालून घेतलेला असतो. देव कोपेल पीक पाणी येणार नाही, दुष्काळ पडल, बरबादी होईल अशी त्याची निष्ठा या ग्राम दैवताशी जुळलेली असते. म्हणून तो ग्रामदैवताला भजत असतो. आपआपल्या ग्रामदेवतेचं महत्त्व वाढवित असतो. शेवटी आपले हितसंबंध जोपासण्यासाठीही त्याला त्यानंच निर्माण केलेल्या या ग्रामदेवताचा उपयोग होतो. लोकांच्या भाबड्या मनाला हे ग्रामदैवत एक विसाव्याचं ठिकाण होतं. आपापलं ग्रामदैवत मानण्याचा त्याच्या या वृत्तीमध्ये प्रगल्भ धर्मसंकेत आणि मूलगामी जीवन निष्ठा दिसते. हे पुरातन काळापासून चालत आलेलं आहे. भूमध्य सागरीय लोकांनी आपल्या संस्कृतीच्या उपासनेमध्ये देवी माता आणि पृथ्वी माता या दोन देवता फार पूर्वीच आपल्या शिव, उमा आदींच्या पूजा आज प्रचलित आहेतच. विष्णू व लक्ष्मी, विष्णूचे अवतार रामकृष्ण या प्रमुख देवता त्यांच्या उपदेवता, गणेश, स्कंद, नाग, नंदी, भैरव, हनुमान, गरुड, शितला देवी इत्यादी देवता त्यानंतर आलेल्या आहेत.

३१