जी परिस्थिती लक्षात येईल, त्यांच्याशी मिळती जुळती स्थिती शेजारच्या खेड्यापाड्याची असेल. आणि थोड्याफार फरकाने तालुक्याची, जिल्ह्याची, त्या विशिष्ट प्रदेशाची असेल. लोकसंस्कृतीच्या अभ्यासाला खरी सुरुवात खेड्यापाड्याला प्राप्त झालेल्या नावापासून होऊ शकते. उदा. जांभूळपाडा, म्हणजे पूर्वी त्या ठिकाणी जांभळाची झाडे अधिक असतील. मेट हा शब्द गावाच्या नावात येतो, त्याचा अर्थ घोडे बांधतात ती जागा, म्हणजे पूर्वी तेथे घोड्याचा पागा असावा. त्यानंतर आपल्या असे लक्षात येते की, एखादे गांव विशिष्ट कुळनांव , किंवा आडनाव बहुसंख्य असलेले आढळतात. उदा. कोलते, चौधरी, दळवी, कोरडे, या एकाचा आडनावाच्या माणसांची भरलेली गावे आहेत. तसेच विशिष्ट जाती आणि उपजाती यांचीही गावे वसलेली असतात. उदा. वारली, कातकरी, महादेव कोळी, कोकणी यांची गांवेच्या गांवे आहेत. लोकसंस्कृतीच्या अभ्यासाने नाव, गाव, जातपात, रीती-भाती यांना महत्व आहे. त्यातच लोकसंस्कृतीची बीजं आढळतात.
एखाद्या गावाच्या अभ्यासात कुटुंबाची दिनचर्या अभ्यासावी लागते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतच्या त्या कुटुंबातील माणसे काय काय करतात. यांच्या एकात्मता, वर्तन, संकोच, आवडनिवड, वेशभूषा, एकूण जीवनमान, राहणीमान इत्यादींची कल्पना येते. हा अभ्यास त्यांच्या सतत सानिध्यांत (लोकांच्या) राहून करता येतो. आणि आपणांस तो लोकसंस्कृतीच्या अभ्यासाच्या दृष्टीने उद्बोधक ठरतो. पहाटेच्या उठण्यापासून, जात्यावरच्या ओव्यातून कुटुंबाच्या श्रध्दा आणि भावना, अगतिकता व आस्तिकता कळू शकते. देव्हाऱ्यातील देवांची अनोळखी नावे परिचित होतात. उदा. हिरवा देव, वेताळदेव, म्हसोबा, मरीआई, इत्यादी.
आहार विहारावरुन आर्थिक, सामाजिक स्थितीची जाणिव होते. काही इष्टअनिष्ट प्रथाही कळतात. परंपरेने चालत असलेल्या आणि मनामध्ये रुजलेल्या लोकसाहित्याच्या अविष्कारातून कौटुंबिक स्थितीवर प्रकाश पडतो. यातूनच मग लक्षात येऊ लागले की, ग्रामीण, अतिग्रामीण खेड्यापाड्यावर माणुसकीचे झरे जिवंत आहेत. गावात आलेल्या पाहुण्यांला अजूनही भोजन-निवास याची