________________
लोकसंस्कृतीच्या अभ्यासाची गरज . . . - - - - -- -- - -- - - HAMARASHTRA STATE महाराष्ट्र राज्य में लोक संस्कृतीचा सूक्ष्म अभ्यास केल्यानंतर असे लक्षात येते की,
- लोक संस्कृतीमध्ये सामाजिक
समरतेची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. तेवढ्या साठीच लोकसंस्कृतीच्या खऱ्या, कष्टसाध्य अभ्यासाची गरज आहे. आपली लोकसंस्कृती बहुंताशाने मौखिक परंपरेतूनच अवतरलेली आहे. .लोक संस्कृतीचे विशेष अद्यापही सर्वार्थाने लेखनाविष्ट व्हावयाचे आहेत. अलिकडे पाश्चात्य . विद्वानांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील प्रमुख १० आदिवासी जिल्हे | लोक विद्येचा, लोकसंस्कृतीचा, लोकसाहित्याचा अभ्यास होऊ लागला आहे. या अभ्यासातून भारतीयतत्व, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समरसता, माणसामाणसातील नात्याचे अभिसरण आत्पस्वकीयांच्या बद्दलच्या सदभावना सिध्द होत आहेत, साकार होत आहेत. ... .. २ सोझी भगरा । २८ ५ो .. . नागपूर संवतमम् अम्शवती. -. -.-- -:-. -. .. लोकसंस्कृतीचा अभ्यास म्हणजे लोकजीवनाचा, लोकमाणसांचा अभ्यास आहे. हे लोकजीवन, लोकमाणसात अभ्यासण्यासाठी अभ्यासकाने लोकांशी समरस होणे लोकात अगत्याने मिसळणे अत्यावश्यक आहे. त्याखेरीज या अभ्यासाला सुरुवात होत नाही. त्यांच्याशी एकरूप झाल्याशिवाय हा अभ्यास संभवत नाही. त्यासाठी एक ओळख खेड्यापाड्यावर असली पाहिजे. त्याआधाराने त्या कुटुंबाशी ओळख होईल. या कुटुंबाच्या ओळखीतूनच त्या गावांशी ओळख होईल. या अभ्यासातून घरगुती नाते प्रस्थापित होईल, त्यामुळे विनासंकोच लोकवाड्मय ऐकायला मिळेल. चालीरीती, प्रथा, रुढी, अंधश्रध्दा कळतील. सामाजिक, आत्मिक, सांस्कृतिक रीतीचे भान होईल. साधारणपणे एका खेड्याची . २७.