Jump to content

पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केला. ते म्हणाले किरकोळ घरगुती भांडणावरून एका आदिवासीने झाडाच्या शेंड्याला जाऊन गळफास लावून घेतला. ते प्रेत वरच कुजले आणि पोस्टमार्टम कसे करायचे, वास सुटला तेव्हा लोकांना त्या आत्महत्येचा शोध लागला. शेवटी आम्ही ते झाड खोडाच्या बाजून कुऱ्हाडीने मूळाकडून संपूर्ण आडवे करुन ते प्रेत खाली घेतले. एवढे काय घडले असेल की त्याने असा बेपर्वा आत्महत्येचा प्रयत्न केला. सासू सुनेच्या किरकोळ भांडणावरून आत्महत्येपर्यंत मजल जाते याचा अर्थ आदिवासींजवळ विचार आजचा तर नाहीच, उद्याचाही नाहीच नाही, अशी माणसं ही आहेत. गांवच्या पंचाकडे येऊन शांतपणे जणुकाही घडलेच नाही अशा पध्दतीने सावकाश सांगतात - 'ते जरा पोरानं गळफास घेतला', तेवढं पोलीसला आवरा, बस्स !

आदिवासी लोककला आणि जीवन :
 ठाणे जिल्ह्यातील आदिवासींमध्ये तहानभूक हरपून बेभान होऊन, आपले कष्ट अर्धपोटी जगणं, नागडे उघडे राहणं विसरून तारपा नृत्य धुंद करणारे रात्र जागविणारे विशिष्ट मोसमात चालूच असते. ढोल नाच आहे त्यात पिरॅमिडस कसरती आहेत. हा नाचणारा काटक असतो. घामाघूम होई पर्यंत नाचतो त्यातच कसरत आणि सर्वस्वही असते. कोलांट उड्या असतात. तारपा वाजवणारा कसदार बळकट तरुण मानला जातो. या ताकदवान तारपा कुंकणाऱ्यांवर आदिवासी तरुणी खूष असतात. त्याच्या नादात त्या गुंगतात आणि सारी दुख- व्यथा- कष्ट विसरून आनंदी राहतात. डाका- ढोल-झांज-नाल वाजवत रात्र जागवतात. देवीचा गोंधळ, बोहाडा, अक्षय्यतृतीया सण, नवीन धान्य; कवळी भाजी, इत्यादी सारे धुंदीत चालू असते. भाताच्या बरोबर गूळ-कणकीची उंडी टाकून शिजवतात. गव्हाची पोळी हेच त्यांचे सणाचे पक्वान्न असते. मर्यादित माफक खर्चात अमर्याद आनंद ते उपभोगतात.

 ठाणे जिल्ह्यातील 'थाळगान'.ही कला या दृष्टीने वाखणण्याजोगी आहे. मेण, काशाचा थाळा आणि सनकाडी/ सागकाडी असले की थाळगानाला सुस्वर कंपनात सुरवात होते. जेवढा वेळ असतो तेवढा वेळ ते कथाकाराचे कथन चालू शकते. सामुदायिक विवाह जसे स्वयंसेवी संस्थांमार्फत चालू असतात. तसेच

२५