पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 शेतीसाठी आदिवासी पाड्याला चिकटून आहे. गाव सोडलं तर शेती हिसकावून घेतली जाईल असे त्याला वाटते. त्यामुळे मुलांची शिक्षणं अर्धवटच ! ७ वी ते ९ मध्ये रखडणारी मुले बहुसंख्य आहेत. शेतीवर राहिले नाही तर शेती आपली नाही हा अपसमज रूढ आहे. म्हणून गाव सोडायला आदिवासी तयार नाही. शिवाय बरेच दिवसात शिक्षण ठाऊक नाही कमाई माहित नाही. मग जेमतेम ८ वी १० फार तर १२ वी होऊन सुखाची नौकरी पत्करायची आणि शहरी वळणाने चैन करायची असे खूळ आदिवासी मुलांमध्ये निर्माण झाले आहे. राहणीमानाचे शहरी, अनुकरण वेषभूषा रंगीबेरंगी, लूझ कपडे एवढ्या पुरतेच मर्यादित आहे पण उच्च शिक्षण घेवून आय. ए. एस. / एम.पी.एस.सी. परीक्षा देऊन राखीव जागेचा लाभ घ्यावा असे त्याना मनापासून वाटत नाही. ती जिद्दही त्यांच्यामध्ये नाही. ही आमच्या ठाणे जिल्ह्यातील पदवीधर आदिवासी विद्यार्थ्यांची खरी शोकांतिका आहे. खुळ्या सारखे ते विचारे एस.एस.सी डी.एड. आणि मिळणाऱ्या चतुर्थ श्रेणी नौकऱ्यातच निमग्न आहेत.

 सर्वकाही मोफत होते या कल्पनेने शिक्षणाचा फार मोठा प्रसार करायला निघालेल्या शिक्षण संस्था नव्याने ठाणे जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात पाय रोवू लागल्या आहेत. सारे काही अनुदानावर चालते आणि नाहीतर फंड गोळा करता येतो. भांडायला, मागायला वाव सतत आहे ध्येयवादी आचार्य भिसेंची परंपरा कुठे आणि स्वार्थाची पोळी भाजणारी मंडळी कुठे ?

 अनारोग्याचे वरदान:
  एका पाण्यामुळे सगळे रोग होतात आणि ते पाणीच मुळी आदिवासी क्षेत्रातील प्रदूषित आहे. त्यामुळे हगवण, खरुज, रक्तदोष, त्वचारोग, नारू, कुपोषणाचे रोग, सर्रास ठाण मांडून बसले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. त्यात फार थोडे सेवा भावी डॉक्टर्स आहेत. बाकीचे नावाला नोकरी संपर्कापुरती व अनुभवा पुरती स्वीकारून खाजगी हॉस्पीटल्स थाटण्याच्या विचारात असतात. त्यामुळे तशी प्राथमिक आरोग्य केंद्रावर सक्ती असूनही उपस्थिती मर्यादितच राहते. त्यांचाही पुन्हा औषधांच्या पुरवठ्या अभावी उपचारांचा नाईलाज असतो. अशा दवाखान्यांचे औषधी खरेदी तंत्रहीं द्राविडी प्राणायामच असते असे ते म्हणतात.

२३