एकुलते एक वस्त्र वाळत घालून आंघोळ करतांना दिसतात. आणि ही आंघोळही सवड मिळेल तेव्हा. नदीला पाणी असेल तेव्हा. अजूनही पिण्याच्या पाण्याची सोय नाही. शुध्द पाण्याचा मुद्दा तर त्यांना ठाऊकच नाही. एखाद्या झऱ्यातील आटत चाललेल्या पाण्यात आणखी खोल खड्डा करायचा तिथे गाडग्या मडक्यात थोडं थोडं करुन पाणी भरायचं आणि चढ उतार पार करीत ४ / २ मैलावरुन हे पाणी आणायचं स्वच्छतेच्या गप्पा सगळेच मारतात पण ह्या अडचणी कोण लक्षात घेतं ? शॉवर बाथ, बाथटप, वॉश बेसिन, २४ तासाचे नळ यांच्या सानिध्यात राहणाऱ्यांना केवळ अस्वच्छता आणि घाणेरडेपणा दिसतो. पण अगदी साधा साबण त्य पाड्यावरच्या कच्छीच्या किंवा बोहऱ्याच्या दुकानात सुगंधी साबणाच्या भावाने विकला जात असतो.
पिळवणूक शोषण चालूच आहे :
सगळेच शोषण आणि एक्सप्लॉयटेशन, अजूनही मोठ्या साहसाने माशा डसत असूनही मधाचे पोळ होळवून काढलेला गरीब बिचाऱ्या आदिवासींचा बिअरची बाटली भर मध तालुक्या शहराच्या गावात अवघ्या ५ रुपयाला विकत घेतला जातो. मेडिकल स्टोअर्स मधून हाच ५ रुपयाला १ लिटर घेतलेला मध, १०० ग्रॅमचे सुरेख बाटली पॅकींग करुन मोठ्या जबर किंमतीत विकला जातो. गावठी बाभळीचा डीग अजूनही भारोभार देऊन मीठ आणि कांदा विकत घेणारे, बटाटे विकत घेणारे आदिवासी आहेत. वनसंपत्ती आणि वनौषधी हिरडा, बेहडा, डीक, जांभळं, करवंद, बोरं, भोपळे, काकड्या मातीमोल भावाने विकून जीवनावश्यक पदार्थ तेल-मीठ विकत घेणे भाग पडते. पुन्हा नोटा मोजता येत नाही. एक हिरवी, एक लाल ५ + २ अशी मिळून ७ रुपये होतात असा अडाणी हिशोब चालू आहे. सावकारांचे फावते आहे. खाजगीतला हात उसना, कर्जबाजारी करणारा व्यवहार चालूच आहे. त्यांच्या मोबदल्यात फार तर सुधारित वेठबिगारी चालू आहे. असे म्हणावे लागेल. मी तुला म्हैस घ्यायला कर्ज देतो तू मला ५ रुपये भावाने एक लीटर दूध घालायचे, बी, बीयाणे, लग्न यासाठी कर्ज द्यायचे आणि त्या मोबदल्यात ऋणाईताला कायमचे दावणीला बांधायचे. रेशन कार्डावरची साखर विकत घ्यायला आदिवासींजवळ पैसे नसतात आणि त्याच्या नावाची साखर परस्पर दुकानदार विकत घेतात आणि आदिवासींच्या नावावर साखरेची पोतं नुसतीच रिकामी