Jump to content

पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ठाणे जिल्हा : एक अदृश्य चेहरा

 आपला भारत देश एक आगळा वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण देश आहे. त्यात नानात्व असले तरी एकत्व सामावलेले आहेच. आपल्या देशातील ही विविधता 'कोणत्याही प्रकारची विषमता निर्माण करण्यात असमर्थ ठरली. उलटपक्षी या विविधतेतूनच एका सुसंवादाची निर्मिती झाली.

 भारतीय संस्कृतीचे अंतःप्रवाह :
 याच भारतीय संस्कृतीचे अंतःप्रवाह आपल्याला त्यातील सर्व राज्यांमधून प्रवाहित झालेले दिसतात. कालभान आणि परिस्थितीनुसार काही वेगळेपण, बदल जाणवत असले तरी मुख्य स्त्रोत एक संध आणि मूलतत्त्वे अबाधित राहिल्याचे जाणवते. भारतातील विविध राज्यात देखील भारतीय संस्कृतीचा ओघ अखंडितपणे प्रवाही आहे. त्याच बराबेर राहणीमान आणि जीवनमान यातील वेगळेपणही राज्या राज्यात भरून राहिलेले आहे. उदाहरण म्हणून काश्मीर, गुजराथ, कर्नाटक, आंध्र, उत्तरप्रदेश इत्यादी कोणत्याही राज्याचा विचार करून पाहा.

 जिल्ह्यांचाही अपवाद नाही :
  यादृष्टीने आपण विविध राज्यांतील जिल्ह्यांचाही विचार केला तर त्यातही प्रत्येक जिल्हा हा आपल्या विशेषांनी युक्त असून वेगळेपणाने उठून दिसतो. याला महानगरांचेही अपवाद नाहीत. मोठे जिल्हे किंवा महानगर याचे केवळ एक रूप किंवा एक चेहरा, पण त्याखेरिजही एक जिल्ह्याचा म्हणून काही अज्ञात अनोळखी चेहरा असतो. या अनोळखी वा अदृष्य चेहऱ्याची मात्र सर्वांनाच ओळख असते असे नाही. त्याची ओळख मुद्दाम करून द्यावी लागते. ज्यांना ती ओळख असते ते स्वतःच अपरिचीत असतात आणि अनभिन्नही असतात.

 ठाणे जिल्हा : अदृष्य चेहरा :
 आपण ठाणे जिल्ह्यापुरताच प्रस्तुत ठिकाणी विचार करावयाचा ठरविला तर ठाणे जिल्ह्याचे नागरी-शहरी स्वरूप शहरवासियांना ज्ञात आहे. पण तरीही

१८