Jump to content

पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धरणारे, झाडपाला खाऊन भूक भागविणारे, आपले आचरण चोख राखणारे, असे आदिवासी पाहण्यात आले. त्यांचे जीवन, शिक्षण, संस्कृती आणि कला मनापासून समजून घेतल्या. त्याचा लळा लागला.

 या लेखसंग्रहात काही ठिकाणी आलेली पुनरावृत्ती वेगवेगळया वेळी हे लेखन झाल्याने आलेली आहे. विषय आकलनासाठी तिची आवश्यकता वाटली. आदिवासींबद्दलच्या या जिव्हाळ्यातूनच 'आरसा : आदिवासी जीवन शैलीचा' म्हणजेच आदिवासी जीवन, शिक्षण कला आणि संस्कृतीचा हा लेखसंग्रह सिध्द झाला आहे. नाशिकचा कुंभमेळा जसा १२ वर्षांनी आला तसा या पुस्तकाच्या प्रकाशनाचा योगही १२ वर्षांनीच येत आहे. हा सुयोग आमचे स्नेही व सुप्रसिध्द साहित्यिक प्रा. केशव मेश्राम यांच्या प्रेमाने व सुनियोजनामुळे येत आहे. ते मुंबई विद्यापीठाचे मराठी, विभाग प्रमुख असतांना त्यांच्या निरपेक्ष प्रेमाचा, सोज्वळ स्वभावाचा, सुजाण जाणिवेचा प्रत्यय आला. त्यामुळे त्यांचीच अग्रक्रमाने प्रस्तावना घ्यावी हे ठरले व त्याला त्यांनी प्रस्तावना देऊन तत्पर प्रतिसाद दिला हाही एक सुयोग म्हणावा लागेल. जव्हारमधील ९ वर्षांच्या माझ्या वास्तव्याचे या ग्रंथनिर्मितीने सार्थक होत आहे.

 महाराष्ट्रातील 'युगवाणी', 'आदिवासी संशोधन व प्रशिक्षण', 'लोकराज्य', 'योजना', 'महाराष्ट्र टाईम्स', 'लोकसत्ता', 'रुची', 'भूषणराज', 'कालतरंग', 'शब्दरंजन', 'स्वयंप्रकाश', 'हाकारा', 'वनवासी', 'वनस्वर', 'वनबंधू', 'वनवार्ता' इत्यादी नियतकालिंकांनी या आदिवासींच्या संदर्भातील लेखांना पूर्वप्रसिध्दी दिली त्याबद्दल त्या सर्व संपादकांचे ऋण व्यक्त करतो. मुद्रणप्रत तयार होतांना प्रा. प्रशांत देशपांडे, प्रा. तुकाराम रोंगटे, श्री. धोंडोपंत गवळी, श्री. जे. डी. शेख व श्री. शशांक व्यवहारे यांचे विशेष सहकार्य लाभले. एच. पी. टी. कॉलेजच्या ग्रंथालयाचे नेहमीच मला सहकार्य लाभत राहणार आहे. त्यांचेही मी आभार मानतो. या ग्रंथाच्या मुद्रणाची जबाबदारी मे. प्रिंटोरियमचे श्री. विक्रम पळशीकर यांनी, अक्षरजुळणी व रेखीव मांडणीची जबाबदारी सौ. अनघा देव आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रकाशनाची जबाबदारी युगांतर प्रकाशन, नाशिक यांनी आत्मीयतेने पेलली त्याबद्दल त्यांचाही मी अंतःकरणपूर्वक आभारी आहे.

१६