पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांच्याकडे हातानेच लिहिलेली असणार : सुवाच हस्ताक्षर, टापटीप, नीटनेटकेपणा, स्वच्छता आखीवरेखीवपणा ही सारी गुरुजींची खास वैशिष्ट्ये लेकनात सामावलेली होती. म्हणून ते वही जपत असत.

काही दुर्मिळ आठवणी :

 गुरुजींनी बनवासी शब्दांचा कोश तयार केला. त्यात सुमारे ३००० शब्द कातकरी, वारली, महादेव कोळी, कोकणा समाजातील आहेत. पेठ, सुरगाणा, धरमपूर भागातील आहेत. मराठी शब्दकोशात हे शब्द नसल्यामुळे त्यांचे मराठी अर्थ दिलेले आहेत. अशा त्यांच्या संग्रहातील हा शब्दकोश प्रकाशित होणे गरजेचे आहे.

 गुरुजींच्या म्हणण्यानुसार सर्याला आवाज स्वरयंत्र असते आणि ते आम्हा आदिवासी बनवासीना बरोबर कळते. मारुती चितमपल्लीच्या साक्षीने या घटनेची नोंद आहे. विशिष्ट वनौषधी पान, जवळ बाळगल्यास सापाची भीती राहत नाही. म्हणून आम्ही जंगलात एकटे आजवर सुरक्षित फिरलो, असे ते म्हणतात.

 वाघाला तुमच्या स्त्रीया सुध्दा कशा भीत नाहीत, खुशाल त्या वाघाची डरकाळी ऐकतात आणि लहान मुलाला मांडीवर घेतलेल्या अवस्थेत बसून राहतात. यावर गुरुजी सांगत 1 शेवटी जाणार कुठे ? कुडाच झोपडं थोडून वाघ आत येऊन खाईलच मग संरक्षणच आतबाहेर कुठे नाही, तर मग घाबरून जीव वाचवायचा कसा?2

 धर्मांतराबद्दल गुरुजींचे म्हणणे असे की ख्रिश्चन मिशनरी जर धर्मातराचा हेतू न ठेवता सेवाधर्म पाळणारे असते, तर मग रात्रीच्या गुपचुप मिटींग ते का घेतात ? उजागर सगळ्यांना सांगून जाहीर विचार ते का मांडीत नाहीत?

 हिंदु महादेव कोळी याती 'हिन्दू' शब्द शासनाने दाखल्यातून गाळावा असे परिपत्रक काढले तेव्हा गुरुजींनी हिंदूच्याच परंपरा जोपासणारे आम्ही असून डोंगरदेव, शंभूनाथ, म्हणजे महादेव हे आमचे दैवत आहे. शेवट हा लढा यशस्वी

झाला आणि हिन्दू महादेव कोळी लिहू नये हे परिपत्रक मागे घेतले गेले. ठाम

१५४