पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भूमिका घेणारे गुरुजी होते. आदिवासी हिंदूच आहे असे त्यांचे मत होते. राष्ट्रद्रोही चळवळी विरुध्द त्यांनी समाजजागृती सातत्याने केली. श्रध्दा जागविली.

वनौषधी तज्ज्ञ गुरुजी:

 नाशिकच्या डॉ. वि. म. गोगटे यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने गुरुजींनी वनौषधीची माहिती प्रथम प्रकाशित केली. त्यांचा इंग्रजी अनुवादही झाला असावा. त्यानंतर स्वतः सखोल माहिती मिळवून ६५० वनौषधी त्यांनी नोंदवून काढा. औषधे रानावनातली (२००२) आदिवासींचे परंपरागत उपचार, ही त्यांची पुस्तकें प्रसिध्द असून या काँमी आयुर्वेद सेवा संघ नाशिकचा सहयोग त्यांना लाभला आहे. कोईमतूरच्या लोकस्वास्थ संवर्धन समितीचे ते आजीव सदस्य होते. कर्जत तालुक्यातील कशेळे येथील आयुर्वेद संशोधन संस्थेचे ते आजीब सल्लागार होते. पहिले अध्यक्षपदही त्यांना लाभले. पक्षांच्या पीसापासूनही विविध गुणकारी औषधी बनविता येतील याची नोंद त्यांच्याकडे असून त्यावर अधिक संशोधन ते करीत होते. लखवा आणि मूळव्याध ते हुकमी वरी करीत होते. या दोन रोगांवरील उपचारांसाठी त्यांची ख्याती होती.

गुरूजींच्या नोंदी : टीपण बहीतील :

 माशांचे प्रकार त्यांनी शोधले होते. जलचरांचा अभ्यास ते करीत होते. १२२ पक्षी आणि त्यांची घरटी, त्यांचे प्रकार याची नोंद त्यांच्याकडे आहे. वेलींची नावे आणि प्रकार त्यांनी लिहीलेले आहेत, कीटक, वन्यपशू, पक्षी, सर्पाच्या जाती यांच्या नोंदी त्यांनी वहीत केलेल्या आहेत. थोडक्यात ग्रामजीवन, वनोपज, निसर्ग सृष्टीचे सूक्ष्म निरीक्षण करुन गुरुजींनी ही टिपणे अनुभवातून घेतली आहेत. त्यांचे जतन तर केले पाहिजे पण त्यात पुढच्या अभ्यासकांनी विशेष भर टाकली पाहिजे. १९५७ मध्येच त्यांचे, 1 आदिवासी लोकगीते2 हे पुस्तक प्रसिध्द झाले. त्यांचे पुनर्मुद्रण केले पाहिजे.

आवारी गुरुजींचा चरित्रपट :

 गंगाराम जानू आवारी गुरुजी यांचा जन्म ५ जुलै १९१९. पेठ तालुक्यातील 'बोरवट' गावी जाला. त्यांचे शालेय शिक्षण फक्त सातवी पर्यंत १९३६ झाले

१५५