आवारी गुरुजी गेले. त्यांना बनयोगी म्हणण्यापेक्षा वनबंधू म्हणणे अधिक
उचित होईल. ते कुटुंब वत्सल राहून बनवासींच्या हितासाठी आहोरात्र झटले.
वनवासींचा विकास व्हावा ही त्यांची सुरवातीपासून तळमळ होती. त्यातूनच
त्यांचे कार्य सिध्द होत गेले.
पेठच्या वनवासी बांधवांच्या आग्रहावरुन जरी नाशिकला आवारी० गुरुजी यांचे
दिनांक ८ जुलै २००३ मंगळवारी दुपारी १.४२ दुःखद निधन झाले होते. तरी
त्यांची अंत्ययात्रा पेठमधील त्यांच्या राहत्या पाड्यावरुन पडत्या पावसात काढावी
लागली. एवढा गुरुजींच्या विषयीची जिव्हाळा त्यांच्या आप्तेष्टांना,
आणिचाहत्यांच्या परिवाराला होता. हेच या घटनेतून उलगडते. एवढेच नव्हे तर
सुमारे ३००० चा समुदाय भरपावसात कशाबदया छत्र्या सावरुन म्हणजे एक छत्री
४-५ लोक असे चिखलभाती तुडवत अखेरपर्यंत आपल्या आवडत्या गुरुजींच्यासाठी
उभे होते. त्याही वेळी उंच बांबूंनी ताडपत्री हाती उभारून त्यापाड्यातील स्मशान
भूमीत गुरुजींचे पोलिसी इतमामात शासकीय मानवंदना आणि सलामी देऊन
दहन केले; अंत्यविधी आटोपला.
उरल्या केवळ आठवणी :
वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र प्रांताचे गुरूजी अध्यक्ष होते. एक वनवासी,
हिंदू संस्कृतीचा जाणकार, जिद्दीचा व ठामपणे भक्कम कार्य करण्यास प्रवृत्त झालेला
वनवासी कल्याण आश्रमाचा आधारवडच गुरुजींच्या दुःखद निधनाने कोसळला
आहे. आता त्यांच्या असंख्या आठवणी केवळ उरल्या आहेत आणि त्याच मनामध्ये
दाटतात.
अत्यंत सांधेपणाने वावरणारे गुरुजी होते. तांबुस काळसर रंग, डोळ्यात बुध्दिमत्तेची चमक,अंगात स्वच्छ नेहमीचा कॉलरचा धुतलेला सदरा, धोतर, पायात