Jump to content

पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चिकाटीनेच उद्योजकता वाढेल :

 आदिवासी क्षेत्रात स्त्रियांनी ना उमेद न होता केवळ नोकरी व्यवसाय मार्गदर्शन केंद्रात नावे नोंदवून, स्वस्थ न बसता मोठ्या जिद्दीने आणि चिकाटीने अशक्य काही नाही, असे समजून उद्योजकता वाढविली पाहिजे. फार तर त्यासाठी एखादी पिढी खर्ची पडते, पण मग पुढच्या अनेक पिढ्यांचा मार्ग सुकर होतो. “पंगुम लंघयते गिरिम” म्हटले जाते ते याच प्रयत्नांच्या बळावर; म्हणून सर्व समस्यांवर मात करुनच दाखवावे. समस्या सोडवतो त्याला युवक म्हणतात. हीच अपेक्षा

आदिवासींकडून आहे.

१५१