पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मनःस्थितीही साथ देत नाही. उत्तम नौकरी हा भलताच समज रुढ होत आहे. वस्तुतः कनिष्ठ चाकरी, उत्तम शेती हा आपला महामंत्र होता. बरं. त्यातूनही एखादा युवक प्रतिकूल परिस्थितीतही धडपडतो तरीही त्याला घरच्या नातेवाईंकांकडून नाउमेद केले जाते. त्यांना उद्योजकतेऐवजी ते नसते उद्योग वाटतात. आर्थिक व मानसिक पाठिंबा आदिवासी ग्रामीण युवकाला धरून, म्हणाल तर अक्षरशः शून्य असतो. कोणीही नोकरीचाच आग्रह धरतो, कारण घरची कमालीची गरिबी. त्यात शिक्षण घेतले आणि पुन्हा पुढे तात्काळ पैसा मिळणार नाही तर वाट पाहावी लागेल, जम बसावा लागेल अशा समस्या असतात. उत्साही युवकाने व्यवसायाचे नियोजन केले, समजा तो सुरू केला तरीही त्यात काही असे म्हणून बंद करणारे नाउमेद झालेले युवक भेटतात. याचे कारण आर्थिक नसो पण मानसिक पातळीवरही पाठिंबा मिळत नाही. जेथे मध्यमवर्गीय पांढरपेशा समाजाची ही स्थिती तेथे आदिवासी क्षेत्राची काय वर्णावी ! त्यामुळे आदिवासी क्षेत्रातील उद्योजकेतसाठी असलेल्या विपुल सोयी आणि सुविधांचा लाभही घेता येत नाही

प्रशिक्षण कौशल्य दुष्प्राप्य:

 यंत्रसामग्रीचा परिचय त्या क्षेत्रातील प्रशिक्षण, बिक्री, उत्पादनकौशल्प, आदिवासी ग्रामीण क्षेत्रातील युवकांना दुष्पाप्य असतात. अनोख्या दूरच्या क्षेत्रातील युवकास एक दिव्य असते. त्यांच्या निरनिराळ्या मुक्त कृषी संलग्न वातावरणाला आणि नवीन संस्कृतीला तो पारखा होतो, कंटाळतो. त्यात नित्याच्या गैरसोयींची भर पडते आणि कधी गावी परत फिरु, असे त्याला होऊन जाते. प्रशिक्षणसाठी आणि कौशल्यप्राप्तीसाठी बैठक लागते, चिकाटी लागते, मानेवर खडा ठेवून काम करावे लागते. यालाही आमच्या आदिवासी ग्रामीण युवकांची मनाने तयारी नसते. कारण ते विमुक्त ग्रामीण कृषी संस्कृतीत वाढलेले असतात. त्यांना कंपनीतील उद्योजकता कराव्या लागणाऱ्या सलग आठ तास कामांचे वळण नसते. त्यामुळे मनापासून प्रशिक्षण घेणे व त्यातून कौशल्य प्राप्त करून घेणे, त्यांना सहज शक्य व सुसह्य होत नाही. उलट जिकिरीचे होते. शिवाय या कालावधीत मिळणाऱ्या तुटपुंज्या स्टायपेंड पुरेसा होत नाही. केवळ विद्यावेतनावर भागत नाही. त्यामुळे

बरेचसे अर्धवट प्रशिक्षण सोडतात, आणि नागरी संस्कृतीत अर्धवट शामील होतात.

१४९