पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परिस्थितीत तरी तातडीने मार्गदर्शन आदिवासी क्षेत्रातील उद्योजकांना मिळणे मुष्किल आहे. तार किंवा टेलिग्राम किंवा टपाल व्यवस्था यांचाही विचार केला तर कोणत्याही अतिग्रामीण आदिवासी क्षेत्रात सर्व संबंधितांनी नेटाने प्रयत्न करुनही व टपाल क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी सर्व काळजी घेऊनही, अपेक्षेपेक्षा जास्त विलंब हा होतोच. समोरच्या मार्गदर्शकाच्या प्रतिसादासाठी अनेकदा तिष्ठत किंवा .खोळंबून रहावे लागते. त्यामुळे उद्योजकतेची उर्मी कंटाळून ओसरू लागते. प्रारंभीचा उत्साह अशा परिस्थितीत टिकवून ठेवणे अवघड होऊन बसते.

प्रतिसादातही प्रतिकूलता :

 समजा सगळ्या अडचणींवर मात करून कोणत्याही प्रकारे ना उमेद न होता समक्ष उठून कार्यालयांमध्ये वा मान्यवरांकडे युवक भेटण्यास गेला, तर तेथे त्याची निवास भोजनाची व्यवस्था नसते. बेरोजगारीच्या या काळात महापालिका • असलेल्या मोठ्या औद्योगिक क्षेत्रात मार्गदर्शनासाठी जाणे, सतत आर्थिक अडचणी न सांगता टाळत राहणे, एवढेच शिल्लक उरते. समजा तो तरीही मोठ्या सहाय्यापर्यंत सल्ला घेण्यासाठी पोहोचला तरी, अशा वेळी अवेळी पोहोचणाऱ्याला लांबून आलेल्या घामाघूम झालेल्या युवकाला अपमानित होण्याचा प्रसंग येतोच. एक तर त्याने अपॉइंटमेंट घेतलेली नसते. अतिग्रामीण भागातून ती पत्राने घेताही येत नाही. दुसरे तो कोठेही नियोजित वेळेला पोहोचू शकत नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या विश्रांतीच्या, जेवणाच्या, काम संपविण्याच्या अशा अवेळीच, तो जेमतेम कार्यालयापर्यंत जाऊन पोहोचणार अशा वेळी माणुसकीचा ओलावा असलेले अधिकारी जरुर ती सर्व गैरसोय सोसून त्या युवकाला मार्गदर्शन करतील; पण पुष्कळदा उपेक्षाच पदरी पडण्याची शक्यता अधिक असते. कचित अवमान झाला तरी गिळावा लागतो. ही बुध्दी या उसळत्या युवकास नसते. तो पुन्हा मार्गदर्शनासाठी म्हणून कोणाकडे जायचे नाही, असेच ठरवित असेल तर नवल. नाही.

कौटुंबिक स्थितीमुळे माघार :

 आपल्या अनेक युवकांमध्ये स्वतंत्र व्यवसाय थाटावा, उद्योजक म्हणून उभे राहावे अशी उमेद दिसते. पण कौटुंबिक स्थिती तर अनुकूल नसतेच पण पालकांची

१४८