पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आदिवासी क्षेत्रातील उद्योजकता

 आज युवकांना नोकरीपेक्षा शिक्षण प्रशिक्षण शासनाच्या सहकार्याने आत्मविश्वास आणि स्वावलंबनाच्या बळावर उद्योजक म्हणून पुढे यावे असे आवाहन केले जाते. सद्य परिस्थितीत ते अत्यंत उचितही आहे. पण आता ग्रामीण, अतिग्रामीण आणि विशेषतः आंदिवासी क्षेत्रात उद्योजकता वाढीला लागणे महाकठीण वाटते. प्रत्यक्षात ज्योजकता बाढींची कल्पना मूर्त रुपात साकार होण्यात कोणकोणत्या अडचणी आहेत, किंबहुना अडचणी असू शकतील त्याचा विचार प्रस्तुत लेखात संक्षेपाने करावयाचा आहे.

दळणवळण सुविधांचा अभाव :

 या संदर्भात पहिली उणीव भासते ती म्हणजे वाहतूक आणि दळणवळण, सुविधांचा अभाव. आदिवासी क्षेत्र अतिग्रामीण क्षेत्रापुरताच विचार येथे करावयाचा असल्यामुळे कोठूनही झटकन संपर्क साधण्याची सोय नाही. किमान ७५ ते १०० किलो मीटर आत हा भाग असतो, रेल्वे, खासगी माणसाची वाहतूक करणारी टॅक्सीची व्यवस्था तर दूरच, पण बस व्यवस्थाही त्याच्याही काही व्यावहारिक अडचणी असल्यामुळे, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या नियंत्रणानुसार अत्यंत मर्यादित असते. त्यामुळे सांस्कृतिक अभिसरण, प्रेरणा प्राप्ती, संपर्कातून नवीन गोष्टी शिकणे, नव्या जगाची आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होणे अवघड होऊन जाते. प्रवासखर्च भरमसाठ वाढतो. बेरोजगार युवा अवस्थेत तरी यावर काही उपाय योजूनही सापडत नाही. हा खर्चिक व कालापव्यय करणारा प्रवास खर्च झेपत नाही.

जनसंपर्क माध्यमांचा अभाव :

 दूरभाष किंवा दूरध्वनी मुंबई, पुणे अशा उद्योगसमूह असलेल्या ठिकाणी संपर्क साधतांना फारसे उपयुक्त ठरत नाहीत. यात वस्तुस्थिती अशी आहे की कर्मचाऱ्यांचे संपूर्ण सहकार्य लाभूनही तासनतास टेलिफोन ट्रॅककॉलसाठी वाटपाहावी लागते. शिवाय टेलिफोन लागला तरी बोलणारे म्हणतात तुमच्याशी

टेलिफोन वरुन मोठ्याने बोलावे लागले की, दिवसभर डोके दुखते. अशा

१४७