Jump to content

पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणि मनोरंजन या गरजाही पूर्ण करण्याच्या दिशेने शिकवतांना प्रयत्न व्हायला पाहिजे हे लक्षात आले. जाणीव जागृती आणि कार्यात्मकता यांची प्रौढ शिक्षणाशी आपल्याला सांगड घालता आली पाहिजे. परिषक आणि प्रगल्थ मुलांचे नव्हे, प्रौढांचे हे शिक्षण आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. या शिवाय प्रौढांसाठी अक्षर आणि अंक ओळखीच्या शिक्षणाबरोबर विविध सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते. नवसाक्षर प्रौढांचे आम्ही वेगळे स्नेहसंमेलनही भरवीत असू. अर्थात तारपा नृत्य, ढोल, गाव, तमाशातल्या सारखे संबाद, गप्पा, टप्पा असे कार्यक्रम आम्ही त्यात गोबीत असू. भजन मंडळ त्यांना स्थापन करायला लावून परिसरातील भजनी मंडळाच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. श्रमदानाचे कार्यक्रम घेतले. ओटे, पार आणि मंदिराचे बांधकाम त्यातून झाले. आणि शिकण्यालाही चालना मिळाली. नवसाक्षर प्रौढांच्या संदर्भात सांगता येण्याजोगे भरपूर अनुभव गाठी आहेत. त्यातील फक्त एक निवड़क सांगतो.

 एका प्रौढ शिक्षण वर्गात पाहुण्यांसह गेल्यानंतर सगळे विद्यार्थी वर्गात उठून उभे राहून स्वागत करावयाचे. एक माणूस असूनच राहिला तेव्हा मी विचारले काय रे ! बाबा, तुम्ही उठून उभे राहू इच्छित नाही ? तुझी इच्छा नाही का ? तेव्हा दुसरा प्रौढ परस्पर उत्तरतो, सर तो कमरेत मोडला आहे. त्याला नीट उभं राहता येत नाही, मग आता आम्ही देतो हे शिक्षण कशासाठी आहे? तू काय करणार आहेस. त्याला असंच खेड्यात उपचाराविना ठेवणार? काय अडचण काय ? त्याला दवाखान्यात का नेत नाही. तेव्हा तो म्हणाला कंडक्टर जवळचा स्टॉप असल्याने बस थांबवित नाही. कंडक्टर म्हणतो अरे जवळच गांव आहे. गांवकरी मंडळींनी बसला आडवे व्हावे. ड्रायव्हरला नीट समंजून सांगा, तुमची गर्दी पाहूनच तो डबल बेल भारतो. 'त्याला सायकलच्या कॅरिअरवर बसवून उद्याच कॉटेज हॉस्पिटलला नेणार आहे.' एक विद्यार्थी उत्तरला. दवाखान्यात गेल्यावर घडली ती घटना पुन्हा अजबच ! त्याला तिथल्या डॉक्टरने पैसे आगितले. तेव्हा सरळ त्या प्रौढाने डॉक्टराल विचारले की 'साहेब सरकारी मोफत दवाखाना मग कोणता आहे, जेथे पैसे लागत नसतात?' हे ऐकताच डॉक्टर खजील झाला आणि म्हणाला, अरे मी गमतीने तुला सहज सांगितले. इथे पैसे लागत नाही. जागरुकतेमुळेच तो साक्षर प्रौढ

विनामूल्य योग्य उपचार घेऊ शकला.

१४६