पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आदिवासींचे प्रौढ शिक्षण - एक अनुभव

 प्रौढ शिक्षणाकडे श्री साधारणपणे १९८३ पासून वळलो. त्याला कराण झाले जव्हार मोखाडा या आदिवासी अतिग्रामीण भागातील नोकरीनिमित्ताने वास्तव्य ! ठाणे जिल्ह्यातील जव्हा, मोखाडा, तलासरी, वाडा, शहापूर आणि डहाणू या आदिवासी क्षेत्रातील प्रवास आणि पाहणी त्याला कारणीभूत झाली. खेड्यांपेक्षा पाडी लहान असतात. अशा अनेक पाड्यांवर जाण्याचा योग अनेक कारणांनी आला.

 एक तर आदिवासी क्षेत्रातील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या जव्हारच्या नव्या महाविद्यालयानेच या कामाला गती दिली. राष्ट्रीय सेवा योजना आणि प्रौढ साक्षरता प्रकल्पांच्या माध्यमातून आम्ही या उदात्त व आत्यंतिक गरजेच्या समाजसेवेच्या कायाकडे वळलो. १९८४ ते १९९२ या ८ वर्षात आमच्या महाविद्यालयामार्फत आम्ही एकूण १०० केंद्र प्रत्यक्षात चालविली. या प्रौढ साक्षरता केंद्राच्या निमित्ताने १०० केंद्रम्हणजे १०० पाड्यांवर आमचे काम झाले आणि ५००० हून अधिक प्रौढांना आम्ही साक्षर करू शकलो. साक्षरते नंतरच्या जनशिक्षण निलयम Post Literacy सारख्या उपक्रमाला राबवू शकलो. या कामाबद्दल मुंबई विद्यापीठाने उत्कृष्ट योजना राबविली म्हणून आमच्या नागरमोडा या पांड्यातील जनशिक्षण निलयम केंद्राला एक टी. व्ही. भेट दिला होता.

 आदिवासी भागातील ठाणे जिल्ह्याचा हा संपूर्ण पट्टा बारकाईने एकदा तुम्ही पाहिलात की अगदी निर्भयपणाने तुम्ही या प्रौढ साक्षरतेच्या कामाला लागावे,अशी अजून स्थिती आहे आणि या कामाचे मानसिक समाधान फार मोठे आहे.प्रौढांना नुसत्या अ आ इ ई या बाराखडी शिकण्यात आणि १ ते १०० आकडे शिकण्यात स्वारस्य नाही ते लगेच कंटाळतात. परस्परांकडे पाहून मिस्किलपणे हसतात, चेष्टेवारीने घेतात हे लक्षात घेऊन आम्ही त्यांच्यासाठी खास उपक्रम नेटाने राबविले. उदरनिर्वाह आणि रोजगारीला चालना मिळविल असे अभ्यासक्रम शिक्षण लिममाध्यमांतून आम्ही वापरले. उदा. पत्रावळी तयार करणे.कुक्कुट पालन, खडू तयार करणे इत्यादींचे प्रशिक्षण या प्रौढ शिक्षणाची गोडीं लागण्यासाठी आवश्यक आहे. अन्न, वस्त्रे, निवारा याबरोबरच आरोग्य, शिक्षण

१४५