पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तोंड द्यावे लागते. तिच्या पदरी सर्वकाळ दास्यत्व येते. नागरी पेक्षा ग्रामीण जीवनातील अडाणी स्त्रीयांची स्थिती आणखी भयानकच आहे. चुलीवरच्या तव्यासारखे किंवा काळ्याकुट्ट कढईसारखे जीवन शिक्षणाचे अभावी स्त्री जन्मा ही तुझी कहाणी काव्यात वर्णिल्याप्रमाणे प्रत्यक्षात आहे.

 'हृदयी अमृत, नयनी पाणी' अशी स्थिती आहे. याचा परिणाम स्त्रियांना सामाजिक दर्जा आणि प्रतिष्ठा नाही. फक्त हजारी २४९ स्त्रीयाच साक्षर असे १९८१ च्या जनगणनेत आढळते. वस्तुतः बुध्दिमत्ता, शौर्य यात महिला पूर्वाशर क्रमी नाहीत आणि त्या असहायही नाहीत. रत्नावली, गार्गी, मैत्रेयी, लक्ष्मीबाई, चाँदबीबी, अहिल्यादेवी इत्यादी. मुक्ताई, जनाई, बहिणाई या साहित् परंपरेतील गुणी स्त्रिया आहेत. जिजामातेने आपले कर्तृत्व सिध्द केले आहेच.

 एक स्त्री कुटुंब सुधारते, म्हणून स्त्रीयांच्या विकासाला स्वातंत्र्य असावे. त्यांना शिक्षणाची समान संधी मिळावी. स्त्रीयांचे जीवनमान आणि राहणीमान उंचावून त्यांना व्यक्तिस्वातंत्र्य पूर्णपणे भोगता यावे म्हणूनच महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण बाढविले पाहिजे आणि आदिवासी महिलांच्या निरक्षरतेचा कलंक पुसला गेला पाहिजे.

आदिवासी स्त्री शिक्षण आलेख वर्ष १९७१ १९८१ १९८५ १९९१ २००१ आदिवासी शिक्षण पुरुष शिक्षण शेकडा स्त्री शिक्षण शेकडा शेकडा प्रमाण प्रमाण प्रमाण ०७:२१ १२.२५ १९.०६ २६.४१ ३१.८७ २९.४२ (अधिकृत उपलब्ध नाही) ३.२२ ९.०५ ९.४८

Ad

१४४