पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

इतरांना शिकविता येते, याचे समाधान मिळते, सही करता येते, बसच्या पाट्या वाचता येतात, नवरा चांगला मिळतो, येथपर्यंत शिक्षणाचे फायदे सांगितले आहेत.

 न शिकल्यामुळे झालेले तोटे सांगतांना अडाणीपणामुळे मजुरी करावी लागते,.. उत्पन्न मिळत नाही, व्यवहार कळत नाही, फसवणूक होते, नोकरी मिळत नाही, परावलंबी राहावे लागते, अन्याय होतो, पिळवणूक होते, समाजात मान मिळत नाही, प्रवासात त्रास होतो, डॉक्टरकडे जाता येत नाही, शेती सोडून इतर चांगली. कामे करता येत नाहीत, चांगले राहाता येत नाही, मुलांना शिक्षणाला मदत करत येत नाही, दुसरे शिकले हे पाहून वाईट वाटते, वजनात सावकार फसवतात, वेठबिगारीची कामे करावी लागतात, समाजात काय चाललेय ते कळत नाही, नवऱ्याकडून होणाऱ्या हालाला, अन्यायाला तोंड देता येत नाही. बचतही करता येत नाही, तर एका महिलेने चक्क, अडाणी राहिलो याचा पश्चाताप होतो, असे सांगितले.

 यापुढे आपण प्रौढ शिक्षण वर्गात भाग घेऊ, प्रगती करू, मुलांना भावंडांना शिकवू, सगळ्यांना शिक्षणाची गोडी लावू, एका शिकलेल्याने दुसऱ्याला शिकविले पाहिजे, स्वतः कष्ट सोसून मुलांना बाहेरगांवी शिक्षणासाठी पाठवायची तयारी दाखविली तर काहींनी आता आपली मुले शिकाविशी वाटतातपण मुले शिकत नाही याचे दुःख होते. आता तुम्हा आमच्यासाठी अंगणवाडी चालवा, शक्य तितक्या जवळ शाळा काढा, गरीब मुलांना सगळ्या मोफत सोयी या, कोणी शिकवायला आले तर आम्हाला आनंद वाटेल. वेळ पडल्यास शिक्षकांनी घरोघर जावून आई वडिलांना समजून सांगावे, खाऊ, कपडे, खेळणी, गाणी, गोष्टी, सिनेमा प्रोजक्टर प्रयोग, चॉकलेटचे वाटप, गणवेशाचे वाटप हे सारे करावे, मुलांना मागतील ते द्यावे म्हणजेच आमच्या मुलांना शिक्षणाची गोडी लागेल. अशा या महिलांकडून आलेल्या उत्तरांचा परामर्श येथे घेतला आहे. कारण ही सर्व मिळालेली उत्तरे मौलिक आहेत. खरेतर शिक्षणातूनच लोकसंख्या शिक्षण उपक्रम यशस्वी होणार आहे. म्हणूनच त्यातल्या त्यात आदिवासी महिलांच्या शिक्षणाचा वसा..

घेणे नितांत गरजेचे आहे.

१३३