पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाही. आदिवासी महिलांच्या पाहणीचा अनुभव या संदर्भात लक्षात घेण्याजोगा आहे. निवडक १३५ विविध उपजातींच्या आदिवासी महिलांकडून प्रश्नावली भरुन घेतल्या त्यामध्ये

क ठाकू ११ वारली ४५ म. ठाकूर ०४ एकूर्ण अशा १३५ महिला होत्या. कोकणा ५० ढोरकोळी ०३ महादेव कोळी २२ → २२ एकूण अशा १३५ महिला होत्या.

 क ठाकूर जातीतील अजिवात शिक्षण न घेतलेल्या महिला ९, कोकणा जातीच्या स्त्रीयांमध्ये शिक्षण अजिबात घेतलेले नाही. अशांची संख्या ३७, दुसरी पास एक, तिसरी पास दोन, चौथी पास दोन, पाचवी पास एक, सातवी पास दोन, आठवी पास दोन, नववी पास तीन, वारली जातीतील अजिबात शिक्षण न घेतलेल्या स्त्रीया - ३८, चौथी पास - १, सहावी पास - २, सातवी पास २, नववी पास ३, ढोरकोळी जातीतील अजिबात शिक्षण न घेतलेल्या स्त्रीया - ४, म ठाकूर जातीतील अजिबात शिक्षण न घेतलेल्या स्त्रीया -४, महादेव कोळी जातीतील अजिबात शिक्षण न घेतलेल्या स्त्रिया १६, चौथी- पास १, सहावी पास १, सातवी पास २, नववी पास १, दहावी पास- १, असे एकूण १३५ स्त्रीयातील शिक्षणाचे प्रमाण आहे.

महिलांनी सांगितलेली शाळा सोडण्याची किंवा शाळेत न जाण्याची कारणे पुढील प्रमाणे आहेत. शाळांचा व शाळेत विशिष्ट वर्गाचा अभाव, पुढचा वर्ग नसणे, वसतिगृहांत दुर्लक्षामुळे प्रवेश न मिळणे, अनुत्तीर्ण होणे, आर्थिक प्रतिकूलता, कौटुंबिक जबाबदारी, घरकाम, धाकटी भावंडे सांभाळणे, गावापासून शाळेचे अंतर दूर असणे, शैक्षणिक दृष्टीचा अभाव असणे, अपंगत्व, बालविवाह, अनाथ, पोरकेपणा, मुलगी म्हणून शाळेत न पाठविणे, लाजेपायी शाळेत न जाणे, पतीने शिकण्यास परवानगी न दिल्यामुळे, समाजाच्या भीतीमुळे, आजारपणामुळे, . शिक्षणाचे महत्त्व न पटल्यामुळे, मोठ्या बहिणीचे अनुकरण केल्यामुळे, मुलीने शिकून काय करायचे, या विचारांमुळे, बाहेरगांची सतत स्थानांतर (कामासाठी

जाण्यामुळे) अशी एकूण वीस एकवीस कारणे हाती आली आहेत. या सर्व

१३१