पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष दिले जाण्यासाठी कोणतीही शाळा एक शिक्षकी असू नये. उलट मुलींना आवडतील असे सणवार उदा. गोकुळाष्टमी, भाऊबीज, रक्षाबंधन, नागपंचमी साजरे करीत पारंपारिक आदिवासी कला दाद्य, संगीत, खेळ यामध्ये रमवीत शिक्षण चालू ठेवले पाहिजे. कायद्याने अल्पवयातील मोलमजूरी गुन्हा आहे त्यांची कटाक्षाने अंमलबजावणी केल्यास अशा मुलींना शिक्षण घेण्याशिवाय पर्याय उरणार नाही.

 मुली लहान असतांना त्यांच्याच बोलीत बोलून जिव्हाळा आणि जवळीक साधून शिक्षणात त्यांची गोडी वाढेल असे सतत पाहिले पाहिजे.

लोकसंख्या शिक्षण आणि सुशिक्षित आदिवासी महिला :

 लोकसंख्या शिक्षण या नव्या उपक्रमाचे सार्थक आदिवासी महिलांच्या शिक्षणातच सामावले आहे. म्हणूनच येथे लोकसंख्या शिक्षणाचा विचार प्राधान्याने केला आहे. लोकसंख्या नियंत्रण कुटुंब कल्याण, आरोग्य, सकस आहार, पर्यावरण रक्षण, विज्ञान निष्ठा, अंधश्रध्दा निर्मूलन, बचत, काटकसर इत्यादी सगळ्याच गोष्टींचे शिक्षण या एका घटकाने होते. आणि आपोआपच लोकसंख्या शिक्षणाचे भान आणि लोकसंख्या शिक्षणासाठी कार्य आपल्या हातून घडते.

 सुशिक्षित आदिवासी महिला आपले जीवनमान उंचावेल, नैतिक मूल्यांची जाण बाळगील राहणीमान सुधारेल, शिक्षणातून अपेक्षित समाज पररिवर्तन आणि नव्या जबाबदाच्या आणि नव्या जबाबदार पालकत्वाची जडणघडण होऊ शकेल.

 आज निरक्षरांमध्ये स्त्रियांची संख्या विपुल आहे. जगातील १/५ पुरुष तर १/३ स्त्रिया निरक्षर आहेत. प्राथमिक शिक्षणामध्ये मुलींचा प्रवेश अद्यापही मोठ्या संख्येने व्हावयाचा आहे. शाळेत जावून अंगर प्रौढ शिक्षण वर्गातून ज्यांनी साक्षरता 'मिळविलेली असते त्यांना ती टिकविण्याची संधी फार क्वचितच मिळते. वाचनासाठी आवश्यक पुस्तके, वृत्तपत्रे त्यांच्या हाती पडत नाहीत आणि त्यांची साक्षरता वापरली न गेल्यास गंजून जाते. शिवाय दैनंदिन व्यवहारामध्ये आवश्यक

असणारे तक्ते, पत्रके, अशांचे नमुने वाचून त्यांना उपयोगाची संधी उपलब्ध होत

१३०