Jump to content

पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ठेवायला हरकत नाही. पण त्यातच गुंतून पडल्यास शिक्षणासाठी योग्य कालावधी द्यावा लागतो आणि कळा सोसाव्या लागतात याची जाणिवच राहात नाही. त्यासाठी आदर्श सुशिक्षित स्त्रीयांची चरित्रे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात संस्कारक्षम वयात या मुलींना वाचायला दिली पाहिजेत. शासनाच्या विद्यावेतनात भरघोस वाढ होणे गरजेचे आहे. वाटल्यास त्यातून शिकणाच्या मुलींच्या घराला हातभार लागला नाही तरी हरकत नाही. मुलगी शिकते याबद्दल घराला ते अर्थसहाय्य व्हायला हरकत नाही.

आदिवासी सुशिक्षित महिला वर्गाचा विचार :

 आदिवासी सुशिक्षित महिला वर्गाचा विचार करतांना आज चित्र आशादायक दिसते आहे. डी. एड. झालेल्या आदिवासी महिला शिक्षिकेच्या वाढलेल्या वेतनात समाधान मानून उत्साहाने शिकवितांना दिसतात. स्वतः जगलेले आणि भोगलेले आपल्या समोर बसलेल्या लहान मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्या मनःपूर्वक लोकशिक्षणाचे कार्यही करतांना दिसतात. क्वचित आदिवासी मुली राष्ट्रीयकृत बँकांमध्ये नोकरी करतांना दिसतात. त्या संपूर्णपणे शहरी वातावरणात म आहेत. परंतु आपल्या भागाचे स्मरण त्यांना सतावतांना दिसत नाही. उलट जी हौस लहानपणी भागली नाही ती भागविण्यात मोठ्या पगाराची नोकरी असलेल्या, आदिवासी महिलांमध्ये (शहरी वातावरणाचा परिणाम म्हणून ) चुरस निर्माण झालेली दिसते. वस्तुतः आपल्या पूर्वस्थितीची जाणिव ठेवून आपल्या आदिवासी भगिनींच्या शिक्षणाची देखभाल त्यांना शहरात आणून त्यांनी करायला पाहिजे. सामाजिक जीवनातही काही आदिवासी महिला बावरतांना दिसतात. पण त्याही महिलांसाठी पाहिजे तेवढ्या मोठ्या प्रमाणावर स्वतः माफक सुशिक्षित असून काही करू शकत नाहीत असे दिसते.

 आदिवासी सुशिक्षित मुलींना आणखी उंच विया विभूषित करण्याची प्रेरणा देणाऱ्या वसतिगृह प्रमुखांनी आणि अधीक्षकांनी मार्गदर्शन करण्याची गरज भासते. गरिबीतून वर येवून शिकणाऱ्या मुलींचे मानसशास्त्र जाणून घेऊन त्यांना ती प्रेरणा देण्याची कुवत आणि प्रगल्भता त्या वसतिगृह प्रमुख स्त्री पुरुषांमध्ये असली पाहिजे.मुलींच्या जेवणापेक्षा, जीवनाचा हिशोब त्यांनी मांडला पाहिजे.

१२९