पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आदिवासी महिलांच्या शिक्षणाचे महत्त्व

आदिवासी महिलांच्या शिक्षणाचे महत्त्व :

 सामाजिक परिवर्तनासाठी स्त्रीयांना सुशिक्षित करणे अत्यावश्यक आहे. शिक्षणाचे हे मोल पंडीत जवाहरलाल नेहरूनी जाणले होते. त्यांच्या मते राष्ट्र. निर्मितीत स्त्रीया देखिल पुरुषांच्या बरोबरीने समान भूमिका बजावू शकतात. म्हणून त्यांनी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्रीयांना बरोबरीनेच बघितले. स्त्री मुक्तीसाठी स्त्री शिक्षण तेवढेच गरजेचे आहे.

अमेरिकन तत्त्ववेत्ता "प्युरिटन" यानेही म्हटले आहेच की,
“We will never be able to see humanity united and happy
till God comes down to earth as a woman."


 प्रत्येक देवच या भूतलावर स्त्रीरुपाने (स्त्री हृदयाने) अवतीर्ण होईपर्यंत आम्हाला मानवता, एकता व सांख्य यांचे दर्शन कधीच होणार नाही. या विचारातील मर्म लक्षात घेतले म्हणजे स्त्री शिक्षणाचे मोल विशेष स्पष्ट होते.

 आदिवासी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न ३४८० रुपयांचे वर जात नाही. कमावणाऱ्यांपेक्षा खाणाऱ्या माणसांची संख्या जास्त आहे. ४-५ पासून ते ३०- ४० पर्यंत माणसे एका कुटुंबात आहेत. एका कुटुंबात दोन दोन बायका आढळतात. त्यात पुन्हा धरसोडीचे प्रकार . यामुळे मुलांची संख्या अधिक अशा दारिद्रय रेषेखालील जीवन जगणाऱ्या कुटुंबात महिला शिकल्या म्हणजे आपोआपच चांगले जगणेही शिकता येते.. महिला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी झाली तर तो घराला आधार होईल. पुन्ही ती पुढच्या पिढीला शिकवील. संपूर्ण घर संस्कारित करील. मातृसत्ताक पध्दतीमुळे आदिवासी महिला सुशिक्षित होणे म्हणजे आमूलाग्रं परिवर्तनाला व प्रगतीला सामोरे जाण्यासारखे आहे.

 पहिल्यांदा स्त्री शिक्षण हा कौल मुलींना दिला पाहिजे. म्हणजे परिस्थिती आणि नोकरीकडे लक्ष राहात नाही. परिस्थिती आणि नोकरीचे सतत भान

१२८