चांगली समजण्याजोगी आहे. तशीच बालकवीची “निर्झरास" ही कविताही
आदिवासींच्या दृष्टीने अप्रतिम समजण्याजोगी आहे. इयत्ता पाचवीतील पाठ ११
"कल्पकतेचे वरदान”, “नानाशंकर शेट" हा १६ वर पाठ किंवा इयत्ता ६ वीतील
“साने गुरुजी” हा पाठ निश्चित चांगला आहे. इयत्ता पाचवीच्या पुस्तकातील
एक ऐतिहासिक क्षण या पाठातील पान ९० वरील एक विधान संस्काराच्या दृष्टीने
फार महत्त्वाचे व चमकदार आहे. कारण त्याचे प्रयत्न अनुभव व ज्ञान यांची
शिदोरी आमच्या पाठीशी होती. म्हणूनच आम्ही हे अन्य यश मिळवू शकलो ही
जमेची बाजू म्हणून सांगता येईल.
पाठ्यपुस्तकातील शुध्द लेखनाच्या व रचनेच्या दोषांचा विचार या ठिकाणी अप्रस्तुत असल्याने केलेला नाही. पाठ्यपुस्तके एक साधन आहे. त्याला साध्य मानता त्याखेरिजही इतर अनेक साधनांनी ज्ञान संपादनाची भाषेची कौशल्ये प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मातृभाषा मराठीच्या दृष्टीने विद्यार्थ्याला प्राथमिक शिक्षणात सुसंगत व स्पष्ट बोलता आला पाहिजे. दुसन्याच्या बोलण्याचा आशय समजला पाहिजे. स्वतःचे विचार साध्या व सोप्या भाषेत स्वच्छपणे त्याला लिहिता आले पाहिजेत. साधारणपणे या क्षमता विद्यार्थ्यांमध्ये याव्यात अशी अपेक्षा आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे आकर्षण निर्माण होईल. पुस्तके शिक्षण लेखन, वाचन, अर्थपूर्ण वाटेल अभ्यासात त्यांचे मन रमेल असे त्यांच्या रुचीचे बहुसंख्य पाठ पाठ्यपुस्तकांत समाविष्ट केले जावे. त्यांच्या ओळखीचे वातावरण गद्यपद्य पाठांतून घ्यावे. अमूर्त कल्पना न पाहिलेल्या गोष्टींची वर्णने व वस्तूंची माहिती यामध्ये त्यांचे मन रमणे अवघड आहे. शाळेत शिकविले जात असलेले विषय आपले नाहीत, ते परक्या भाषा विश्वातील आहेत, असे त्यांना वाटायला नको. विद्यार्थ्याला दसरा, बोहाडा, अक्षयतृतीया यासारखे परिचित सण उत्सव पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावेत, कोकणी शब्दाप्रमाणे आदिवासी
बोलीतील काही शब्द घेतल्यास त्यांना ते कळतील, पुस्तकातील मराठी भाषेतील संदर्भ, संकल्पना, परिस्थिती व वातावरण नित्यपरिचयाचे वाटेल, भाषा सुबोध असल्यास आकर्षणही सुलभ होईल, अन्यथा सर्वांसाठी समान असलेल्या शिक्षण पध्दतीचा फेरविचार करावा लागेल.