आली असती. पण पुस्तकात शरद, अभय, कुमुद, सुहास, नंदा, चंदा, अशी नावे
आढळतात. यापेक्षा ग्रामीण भागातील, महादू, हरि, सोभा, गोमा, धर्मा, ही
नावे संयुक्तिक झाली असती. साधी पुस्तकातील चित्रेही आदिवासींच्या दृष्टीने
अनुकूल व त्यांना ओळखीची वाटतील अशी असती तर त्यामुळे विषय आपला
अशी भावना मराठी मध्ये निर्माण झाली असती. पण वाव असूनही आदिवासींना
अनुकूल अशी ओळखींची चित्रे पुस्तकात नाहीत. आदिवासींच्या दृष्टीने अनेक
कठीण शब्दांचे अर्थ द्यायला हवे होते. पण नेमके कठीण शब्दांचे अर्थ दिले नाहीत.
उदा. ४ थीच्या पुस्तकातील २१ व्या पये पाठातील महतू राजाची चाहूल या
कवितेतील "बाहल्याने" या शब्दाचा अर्थ यायला हवे होते. पण नेमक
शब्दाचे अर्थ दिले नाहीत असे अनेक शब्दांच्या बाबतीत झाले. क्वचित चुकीच्या
शब्दांचे अर्थही दिले आहेत उदा. ४ थीच्या पुस्तकातील पान १९ वर दिगंतरा
शब्दाचा अर्थ आकाशाऐवजी, दुसरी दिशा असा दिला आहे. काही ठिकाणी
अपेक्षित तारतम्य पाळले नाही. उदा ४ थीच्या पुस्तकात पान १९ वर "हाऊस
बोट" यासारखा इंग्रजी शब्द, इंग्रजी विषय सुरू नसतांना आलेला आहे. इयत्या
५वी सारख्या वर्गाला पद्यपाठ क्रमांक २७ अन्योक्ती / कृष्णशास्त्री चिपळूणकर
सारखी कविता आहे. इयत्ता ५ वीच्या दृष्टीनेही कल्पना खरोखरच अवघड आहे.
पण अन्योक्ती कल्पनेची सांगड घालावी म्हणून या कवितेचा समावेश झाला
असावा. इयत्ता ५ वीच्या पुस्तकातील "बीज पेरलं गेलं" हा गद्यपाठ म्हणजे चंदू
बोर्डे यांची आत्मकथा आहे. परंतु आदिवासी विद्यार्थ्याला हा धडा समजणे अवघड
आहे. त्यांच्यापर्यंत क्रिकेट हा खेळ पोहोचलेलाच नाही. याचा अर्थ दुर्गम, डोंगराळ
भागातील आश्रमशाळा व पाड्यापाड्यातील विद्यार्थ्यांचा विचार पाठ्यपुस्तक
तयार करताना नीट केला जात नाही असे म्हणायला वाव आहे. याच पुस्तकातील
५ वा पाठ "आजीने पाहिलेला चोर" हा चांगला असला तरी आदिवासी
विद्यार्थ्यांच्या दृष्टीने त्यातील वातावरण परिचयाचे नाही. तसेच इयत्ता ६ वीच्या
पुस्तकातील "उभा जन्म लोकसेवेला वाहीन", "विश्राम माझा विरंगुळा",
"यशवंतराव चव्हाण", "झुबेलाल सर” / “इंदिरा" हे पाठ विद्यार्थ्यांच्या
आकलनाच्या दृष्टीने अवघड वाटतात.
आदिवासींच्या दृष्टीने “खोप्यामधी खोषा” ही बहिणाबाईंची कविता अतिशय