पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आदिवासी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पाठ्यपुस्तके

 आदिवासी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून इयत्ता १ ली ते इयत्ता ७वी पर्यंतच्या मराठी पाठ्यपुस्तकांचा विचार येथे केला आहे. एकंदरीत आदिवासी विद्यार्थ्यांची मराठी विषयाची अवस्था लक्षात घेता त्या मानाने पुस्तकांचा दर्जा त्यांच्या दृष्टीने न पेलणारा वाटतो. साररूपाने सांगावयाचे तर निसर्ग, पशुपक्षी, कृषिजीवन आणि संस्कृती याविषयावरील गय पद्य पाठ सोडल्यास ही पुस्तके आदिवासींना समोर ठेवून तयार केलेली वाटत नाहीत. प्रत्येक जातिजमातीला वा प्रदेशाला समान स्थान देणे हे जरी अशक्य असले तरी तितकेच खरे आहे की आदिवासी विद्यार्थ्यांना जिव्हाळा वाटावा, काही आपल्या ओळखीच्या जीवनाच्या खुणा त्यात दिसाव्यात. आपल्या मनाचे जगण्याचे, संस्कृतीचे, चालीरीतेच, श्रध्दांचे, काही प्रतिबिंब त्यात दिसावे अशी वस्तुस्थिती नाही. त्यामुळे फार तर हुषार विद्यार्थ्यांना पोपटपंची पध्दतीने ती पाठ असतीलही. परंतु प्रत्यक्षात आशयाच्या दृष्टीनेही पुस्तके आपल्यासाठी आहेत असे वाटले पाहिजे. असे फारसे काही कोठे गवसले नाही. म्हणूनच आदिवासींची मराठीची कुवत अधिक वाढविण्याची आवश्यकता विशेषत्वाने जाणवते. वस्तुत: आदिवासींसाठी काही गद्य पद्य पाठांचा समावेश, कोणत्या तरी वर्गाच्या पाठ्य पुस्तकात करता येणे सहज शक्य होते. पण प्रत्यक्षात आदिवासींचा विचार, पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीच्या वेळी केला गेला पाहिजे, असे आढळत नाही. असे पाठ्यपुस्तकांच्या स्वरूपावरून म्हणायला वाव आहे.

 याचा अर्थ इयत्ता १ ली ते ७ वी ची मराठीची पुस्तके वयोगटानुसार रोचक नाहीत असे म्हणावयाचे नाही. खरोखरच काही गय पद्य पाठ उत्कृष्ट आहेत. संस्कारक्षम आहेत. विविध शैलीचे दर्शन, तसेच विविध वाडमयप्रकारांचे दर्शन यातून घडते. पण महाराष्ट्रात ५ लाखांहून अधिक आदिवासी असणान्या, मराठी बोलणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचा गंद्य व पद्याची निवड करतांना विचार केला गेला नाही असेच म्हणावे लागेल.

 प्रामुख्याने शहरी मध्यमवर्गीय पांढरपेशा वर्गाचे चित्र शालेय पुस्तक

निर्मात्यांच्या डोळ्यासमोर दिसते. सुशिक्षित घर आणि कुटुंब येते गृहीत असावे.

१२४