Jump to content

पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पूर्णस्वरुपात यायला अक्षम्य विलंब होतो तो टाळला पाहिजे. हे शासकीय धोरण,त्यातली लाल फीत आणि नोकरशाहीची ओतप्रोत अनास्था ह्यावरील कढवट भाष्य ठरावे, यात शंका नाही.

 'एकंदरीत आरसा : आदिवासी जीवनशैलीचा' हा लेखसंग्रह, माहिती, मार्गदर्शन, चिंतन, कानउघाडणी आणि वस्तुनिष्ठ व्यवहार्यता, ह्यादृष्टीने मौलिक झाला आहे. त्याबद्दल प्राचार्य डॉ. भास्कर गिरधारी यशस्वी ठरले आहेत असे निःसंकोचपणे म्हणावे लागेल.

 असे असूनही ह्या पुस्तकातील काही छोट्या त्रुटीही आस्वादात विक्षेप आणतात. जरी हे लेखन वेळोवेळी व प्रासंगिक कारणांनी केले गेले असले तरी थाळगान, बोहाडा, सण, उत्सव, उपाय ह्याबाबतीत चारपाच ठिकाणी, ठराविक अंतराने येणारी पुनरुक्ती खटकत राहते.

 काही इंग्रजी संज्ञांना अद्यापही नेमके सार्थ मराठी प्रतिशब्द उपलब्ध नाहीत, हे मान्य करूनही अर्धवट सेट, नुसत्या नोटस, हाऊसमास्टर्स, पेपरला, ट्रेड, स्टेज, कोच, पब्लिक स्कूल, बँक मॅनेजर, अकाऊंटींग, रेक्टर, रिमांड होम हे शब्द मात्र कानाला खटकत राहतातच हे कोणीही मान्य करेल.

 इतकेच नव्हे तर डॉ. श्रीकांत जिचकार यांनी माडिया गोंडाबद्दलची जी माहिती दिली आहे, ती खूप खूप भूतकाळातली अशी आहे. वीज, एस.टी.ची बस, केळे सोलून खाणे, पालाचे वस्त्र (वल्कले), परिधान करणे वगैरे न पाहणारा एखाददुसराच असल्याच असावा. माहिती रंजक वाटत असली तरी कालोचिततेपासून निराळीच अशी आहे. डॉ. गिरधारी यांनी स्वतः त्यावर तीव्र भाष्य करणे आवश्यक होते.

 लिहिण्याच्या ओघात काही वाक्प्रयोग विचारदुष्ट व तर्काला छेद देणारे उरले आहेत. ते जाणीवपूर्वक विपर्यस्त लिहिले असतील तर ते ललित लेखणात चालले असते.विचार, चिंतनात ते अप्रस्तुत वाटतात. डोक्यावरून पाणी फिरणे,

१२