Jump to content

पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विद्यार्थ्यांच्या मनांची सर्वांगीण मशागत कशी करता येणे शक्य आहे, ह्याअनुरोधाने डॉ. भास्कर गिरधारी यांनी आपल्या अनुभवातील कडूगोड घटकांतून सिध्द केलेली उपाययोजना आणि त्याचा दूरगामी विचार, म्हणावा लागेल.
१. पहिली गोष्ट म्हणजे, त्याला शिक्षण, आरोग्य, नोकरी या सुविधा सवलतींसह पुरवून समान (समाज नव्हे) पातळीवर आणले पाहिजे. मग विशेष सवलतींची गरज राहणार नाही. आज जसे त्याचे शोषण होते तसे होता कामा नये.
२. त्याच्या कलांचा सूक्ष्म अभ्यास होणे गरजेचे आहे.
३. केवळ जेवणाचे हिशोब ठेवणाऱ्या वसतिगृहप्रमुखांपेक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनाचे हिशोब मांडणारे हाऊसमास्टर्स पाहिजेत.
४. आदिवासींसाठी उत्कर्ष योजना गंभीरपणे राबवण्याची गरज आहे.
५. आदिवासींना सुयोग्य शिक्षण व कालेचित संस्कार घडणे डॉ गिरधारी अग्रक्रमाचे मानतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भाऊराव पाटील यांची नावे त्यांना कळणे त्यामुळेच अगत्याचे वाटते. आदिवासींना शिकविणे हे आव्हान ध्येयवादी व्रती बनून पेलले पाहिजे. मनःस्वास्थ गमावलेला माणूस, आदिवासी भागात विशेषकाहीकरू शकत नाही.
६. आजच्या शिक्षणाबद्दल, सातत्याने तीन तपे शिक्षण व्यवसायात व्यतीत करणाऱ्या डॉ. भास्कर गिरधारी यांचे निदान, संवेदक अभ्यासकांनी आणि विचारवंतांनी गंभीरतेने दखलपान समजून, त्यावर सुयोग्य उपाययोजना करायला पाहिजे. एके ठिकाणी ते म्हणतात, आजच्या शिक्षणामधून स्वाभिमान व स्वावलंबन या गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत याचे दुःख वाटते.
७. पाठ्यपुस्तकातील पाठांचा, त्यातील भाषेचा व आशय संपृक्ततेचाही डॉ. गिरधारी आवर्जून उल्लेख करतात. पाठ्यपुस्तक निर्मितीच्या वेळी आदिवासींचा विचार केला पाहिजे. असे ते ठासून सांगतात. कारण त्यातच आदिवासी शिक्षणाच्या अनास्थेचे मूळ आहे, हेच त्यांना दाखवून द्यायचे आहे.

 आदिवासींच्या उत्कर्षाच्या नव्या दिशेचे प्राचार्य भास्कर गिरधारी यांनी केलेले चिंतन व मार्गदर्शन अंजनाप्रमाणे आहे असे मला वाटते. इतकेच नव्हे तर आजच्या ह्या माहितीतंत्रज्ञानाच्या काळात, जाहीर खूप काही होतं पण प्रत्यक्षात कामे

११