पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हाच शिक्षणातील अडथळा आहे त्यामुळे एकदा पाया कच्चा राहिला की पुढील शिक्षण घेता येत नाही. विद्यार्थ्यांची अनुपस्थितीची कारणे, झोपड़ी पेटली, मारामारी झाली, भावाला अटक झाली, आत्महत्या केली असली भयानक असतात. यावरून त्यांचे जीवन कळते. त्यांचे गांभीर्य उमगते.

 प्राथमिक शिक्षणाच्या नुसत्या सार्वत्रिकी करणांत आनंद न मानता त्याचा दर्जा तपासला म्हणजे मंग आश्रमशाळांची संख्या स्थिती पुरेशी समाधान कारक नाही. शिक्षणाला लागणारा कालावधी लक्षात घेता गरीब आदिवासी पालकाला एवढी कळ सोसवत नाही. त्यामुळे शिक्षण गरजेचे व अत्यावश्यक वाटत नाही. पालकालाच शिक्षणाची प्रेरणा नाही. शैक्षणिक वातावरणाची उणीव ही फार मोठी बाधा आदिवासींच्या शिक्षणात झाली आहे.

 ग्रामीण भागात रुचेल, त्यांच्या पचनी पडेल असा वेगळा अभ्यासक्रम त्यांना दिला जात नाही. शिक्षण म्हणजे आरोपण कलम करणे नव्हे, अंकुरण आहे, हे आपल्या शिक्षण पध्दतीत विचारात घेतले जात नाही. उन पाऊस थंडीत कित्येक मैल अनवाणी पायी चालणान्या, फी साठी गवत कापणाच्या, अर्धपोटी राहणाच्या अभ्यासक्रम समान पण सुविधा परिस्थिती समाज नसलेल्या, भोवताली प्रगतीची चिन्हे नसतांना या मुलांनी शिक्षणाला रामराम ठोकला, तर दोष कुणाचा हा प्रश्न आहे पण उपाशी पोटी हे केवळ अशक्य होऊन बसते. कवी नारायण सुर्वेनी म्हटल्याप्रमाणे -

"कळलाच नाही भाकरीचा अर्थ
ग्रंथातले स्वर्ग कशासाठी"

 हा खरा प्रश्नच आहे अशावेळी अभ्यास करून तो फारशी नवीदृष्टी प्राप्त करून घेऊ शकत नाही. शहरी शिक्षणाच्या संदर्भात असमानता ग्रामीण शिक्षणात असूनही गुणवत्ता आणि मूल्यमापन कसोट्या मात्र समान आहेत, म्हणून प्रमाण मराठीची लेखन, वाचन, संभाषण, श्रवण ही सारी कौशल्ये, आदिवासी

विद्यार्थ्याने आत्मसात करणे अगत्याचे वाटते.

११७