पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्हायला पाहिजे व झाला आहे असे वाटते. तेवढा प्रसार झालेला दिसत नाही. पुढील (पानावर दिलेला) आदिवासी स्त्री पुरुष तक्ता पुरेसा स्पष्ट आहे.

 वर्ष    | आदिवासी शिक्षण | पुरुष शिक्षण शेकडा | स्त्री शिक्षण शेकडा |
          प्रमाण                प्रमाण                प्रमाण

१९६१ ०७.२१ १२.५५ १.७५ १९७१ ११.७४ १९.०६ ३.२२ १९८१ १९.३२ २६.४१ ९.०५ १९८५ २१.८७ ३०.०६ ९.४७

 आदिवासी परिसर अद्यापही मागासलेला आहे. त्याला कारण संपर्काचा संज्ञापनाचा अभाव, समनुयोग साधत नाही. पालक शाळेत पाठवायला तयार नसतात. नेमक्या मुलींच्या स्वतंत्र शाळा खेड्यात नसतात. लोकभ्रमाचा कळस म्हणजे शिक्षणाने मुलगी विधवा होते, यासारख्या समजुती आढळतात. एक शिक्षकी शाळाही होणाऱ्या आदिवासी शिक्षणाच्या हेळसांडीला कारणीभूत आहे. याचा परिणाम म्हणजे शिक्षणातील स्थगन आणि गळतीत होतो. बालवर्गातील १००० मुलांपैकी एक मुलगाच पदवीधर होतो. परीक्षा पध्दतीचाही हा दोष असू शकेल. आदिवासी मुले चौथी पर्यंत ८ टके आणि सातवी पर्यंत ४ टक्के पोहोचतात. एका शाळेच्या पाहणीत तर १०० मुलांपैकी फक्त २३ मुले व १०० पैकीच फक्त १५ थुली पाचव्या इयत्तेपर्यंत जेमतेम पोहोचल्याचे आढळले.

 सक्तीच्या सार्वजनिक मोफत प्राथमिक शिक्षण योजनेत ६ ते १४ या वयोगटातील मुलाला शाळेत न पाठविणे हा कायद्याच्या दृष्टीने गुन्हा आहे. पण जिथे याची सुजाण समाजात दखल घेतली जात नाही तेथे अडाणी आदिवासींची परिस्थिती अधिकच चिंता करायला लावणारी आहे. आदिवासींची शिक्षणगती अतिशय मंद गोगलगायसारखी आहे. ही गोष्ट क्लेशदायक आहे साधे कपडे. नेसायला नाही. एवढ्या गरिबाने शिकून जंगावे कसे हा प्रश्न आहे. म्हणून त्या आदिवासींना शिकण्यात फारसा राम वाटत नाही. प्रमाण मराठी इंग्रजी माध्यम भाषा माध्यम लवकर उमगत नाहीत, आपसातील भांडणे, परिस्थिती-

अन्यायाबद्दल तक्रारी न करण्याची प्रवृत्ती, अंधश्रध्दा, असंघटितपणा, असंहकार,

११६