पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देणारे वॉर्डन निवडावेत.

 निष्णात शिक्षकांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानमाला, मोबाईल लायब्ररी लॅबोरेटरी, फिरते वाचनालय, प्रयोगशाळा, दवाखाने, शिक्षणोपयोगी पुस्तके, नियतकालिके यांचा पुरवठा आदिवासी विद्यार्थी जगतात असला पाहिजे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांना गावात रोजगार हमी असावी. प्रौढ शिक्षण सुविधा हवी. म्हणजे त्यांचा प्रतिसाद वाढेल. आदिवासी जमातीसाठी अनुकूलं व गोडी वाढविणारे अभ्यासक्रम असावेत. सोपे मराठीचे माध्यम असावे. इंग्रजी ऐच्छिक ठेवावे, सक्तीचे नको, यातून वनवासींचा नव्या शिक्षण पध्दतीत विकास

होईल.

११४