Jump to content

पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असा कांगावा एक विद्यार्थी करीत असल्याचे उघडकीला आले. ग्रामीण शिक्षक पालकांनी हा भोळा भाव सोडून दिला पाहिजे.

आदिवासी मंडळे :

 “आदिवासी विद्यार्थी मंडळ" शाळा कॉलेजात स्वतंत्रपणे आपल्या अडचणी सोडविण्यासाठी स्थापन झाले पाहिजे. म्हणजे एकाकी न पडता संघटितपणे विद्यार्थी आत्मविश्वासाने शैक्षणिक वातावरणात रमतील. मागण्यांपेक्षा कर्तव्याच्या जाणीवेसाठी सामूहिक जीवनासाठी अशा मंडळांची गरज असते.

 शिकतांना आदिवासी मुलांना विशेष मोकळीक दिली पाहिजे. त्यांना मुक्तपणे स्वतंत्र नाचू बागडू दिले पाहिजे खेळ खेळू दिले पाहिजेत. भजन, ढोल, तारपा, कोळी नृत्येही करू दिली पाहिजेत.

 आदिवासी भागात ध्येयवादी समाजसेवा अंगी बाणलेल्या शिक्षकांची अधिक चांगल्या विशेष वेतनावर नेमणूक केली पाहिजे. त्यांच्या निवासाची, मुलांच्या ' शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे. थोडक्यात त्याला स्वतःला भवितव्याच्या .. विवंचना नसल्या तरच तो ग्रामीण आदिवासी भागात मनःपूर्वक काम करील. सुखवस्तू लोकांपेक्षा सोशिक गुणवत्ताधारक शिक्षकांची, आदिवासी भागात वरी गरज आहे.

 वसतिगृहांची संख्या वाढविली पाहिजे. भोजन, निवासव्यवस्था असल्याखेरीज आदिवासी विद्यार्थी शिकणार नाहीत, हे सत्य आहे. ही वसतिगृहे . संमिश्र जातीच्या विद्यार्थ्यांची असावीत, केवळ आदिवासी, बी. सी. अशी .. वसतिगृहे नसावीत. वसतिगृहात आदिवासी बी. सी. विद्यार्थ्यांच्या जागा नोकरीप्रमाणेच सर्वत्र राखून ठेवल्या पाहिजेत. म्हणजे सांस्कृतिक अभिसरण होईल. चांगली स्पर्धा होईल. परस्पर सहकार्याने संस्कृतीचा त्यांना बोध होईल. या बसतिगृहाचे प्रमुख आदिवासी विद्यार्थ्यांच्या केवळ जेवणाचा हिशेब मांडणारे नसावेत तर जीवनाचा हिशेब मांडणारे असावेत. पौगंडावस्थेतील, किशोरावस्थेतील, युवावस्थेतील, मुलांचे मानसशास्त्र जाणून त्यांना योग्य वळण

113