पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उत्कर्ष योजना गंभीरपणे राबविल्या जाण्याची आवश्यकता आहे. अडचणी आणि समस्या खूप आहेतच पण आदिवासी विद्यार्थी उत्कर्षासाठी उपाय शोधणे फार महत्त्वाचे आहे.

पाड्याचे एकत्रीकरण व्हावे :

 आदिवासी समाज आणि विद्यार्थी वर्ग एकोप्याने नांदण्यासाठी पाड्याचे एकत्रीकरण केले पाहिजे. त्यामुळे आदिवासींना उपजातींचे बांध मोडता येतील. अधिक मोठ्या प्रमाणात सुसंघटीत होऊन एकमेकांच्या आधाराने ठामपणे उभे राहून सोयी प्राप्त करून घेता येतील. उदा. अशा गटात किमान एक माध्यमिक शिक्षणाचे केंद्र व्यवस्थित चालेल. आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेशं देतांना केली जाणारी आदिवासींमधील जाती उपजातींची वर्गवारी उदा. कोकणी, बारली, ठाकूर, कातकरी, महादेव कोळी, इत्यादी तूर्त विचारात घेतली जाऊ नये आणि विशिष्ट टक्केवारींचीही अट ठेवू नये. आदिवासींमधील कातकरी, ढोर, ठाकूर या अतिमागास जातींच्या भल्यासाठी ही वर्गवारी असली आणि अभ्यासाला दर्जा येण्यासाठी टक्केवारींची अट असली, तरीही नुकत्याच शिकू पाहणाऱ्या आदिवासी समाजातील विद्यार्थ्याला, निदान नाशिक, ठाणे जिल्ह्यात तरी अटी नसाव्यात, असे या भागातील आदिवासी विद्यार्थ्यांकडे पाहून म्हणावेसे वाटते.

शिक्षणाचा कंटाळा :

 आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणाचा दर्जा पाया घालणारा असल्याने उत्तमच असला पाहिजे. त्यांचे भ्रम, अंधश्रध्दा, अपसमज याच वेळीच दूर झाले पाहिजेत. उदा. शिक्षणात हुशार असलेल्या मुलांना करणी केली जाते असे गैरसमज वेळीच दूर झाले पाहिजेत. काही वेळा आदिवासी विद्यार्थी याचा गैरफायदा घेऊन आपल्या अज्ञानी, अडाणी पालकांना नाडतात. त्यांचे दोन किस्से एका मुलींच्या वसतिगृहातील मुलगी पाटीवर बिब्ब्याच्या फुल्या शिक्षणासाठी आले की उमटतात, अशी तक्रार करी. तीन चार वेळा असे झाले. पालकही काळजीत पडले. नंतर कळले की हात पोहोचतो तेथेच पाठीवर ती रात्री स्वतःच्या हाताने बिब्याच्या फुल्या मारी. गावी जाण्यासाठी तिनेच हे ढोंग रचले होते. हाच प्रकार

पोट दुखण्याच्या बहाण्याचाही आहे. शिकायला ठेवले की पोट दुखणे सुरू होई,

112