पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विज्ञान विषयाला तर शिक्षक नसतांनाच वर्ष पार पडते. ज्याला शिक्षणाची पायाभरणी म्हणतात, ती कधी केली जात नाही. मग हा विद्यार्थी जीवनाचा शिक्षणाचा इमला मधेच कोसळल्याशिवाय राहात नाही. नापास व्हावेच लागते पण या आपत्तीचा पाढा वाचण्यात अर्थ नाही. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील उत्कर्षासाठी काही निश्चित पावले टाकली गेली पाहिजेत.

उत्कर्षाची नवी दिशा :

 आदिवासी समाजाच्या उत्कर्षासाठी पुढील सूचनांचा विचार होणे आवश्यक आहे.
 १. परिस्थितीने गांजलेल्या अडाणी, अज्ञानी पालकांना, नातेवाईकांना गावातील भोवतालच्या माणसांना पचनी पडेल अशा बोल भाषेत समजावून सांगणे आवश्यक आहे, समजावल्यानेच समजेल असा हा समाज आहे. पायातल्या पायतणाने उन्हाचे चटके, जसे बसत नाहीत तसेच शिक्षणाने जीवन सुधारते,. दारिदयाचे चटकेही प्रसंगी कमी होताल. बा. भाषेत शिक्षण हे सर्वांगीण उन्नतीचे साधन आहे हे त्यांना पटवून यायला हवे,
२. तुलनेने व्यसनाधीन माणसे कमी अधिक प्रमाणात आढळतात, तंबाखू, बिडी, दारू यांची व्यसने सर्रास आढळतात. व्यसनांना पर्यायी मनोरंजनातील गुंतवणूक, त्यांची व्यवस्था केली पाहिजे. मनोरंजनासाठी तारपा, बास, ढोलकी, नाल, टाळ, तबला, पेटी इत्यादी बाथे उपलब्ध करून दिली पाहिजेत. कारण आदिवासी लोक हे देवभक्त आहेत. उत्सव, व्रतवैकल्ये त्यांच्या त्यांच्या पध्दतीने एकजुटीने साजरे करता येतील असे वातावरण निर्माण केले पाहिजे. अक्षय्यतृतीया, दसरा, दिवाळी, होळी, कोजागिरी, श्रीकृष्णजयंती, नवरात्र, गणेश उत्सव, सत्यनारायण हे सगळे उत्सव रात्रभर समूह नृत्य करून त्यांना जागवता आले पाहिजेत. आज पावसात त्यांचा बोहाडा थांबतो. त्यासाठी एक मोठा कम्युनिटी हॉल बांधून दिला पाहिजे. विद्यार्थ्यांसाठीही अशा प्रकारचे मनोरंजन गरजेचे बनले आहे. त्यांना डांबून ठेवण्यापेक्षा मुक्तपणे उमलू दिले पाहिजे. भग ते वसतिगृह, आश्रमशाळा, महाविद्यालये असो

 ३. आदिवासींसाठी जी वसतिगृहे आणि त्याहीपेक्षा ज्या आश्रमशाळा आहेत.त्याची स्थिती भयंकर आहे, शोचनीय आहे. ज्याठिकाणी कोवळ्या बालमनावर

१०७