पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लागत असल्याने शिक्षण पूर्ण करता येत नाही. ही एक वेगळीच अडचण निदर्शनास आली आहे. शासनाच्या वतीने पुढील (सातव्या) योजनेत पंचावन्न हजार नवीन प्राथमिक शाळा काढण्याचा संकल्प आहे. त्याची सिध्दी झाली तर गावातशाळा उपलब्ध नाहीत, ही सबबही यापुढे सांगता येणार नाही. पण धाकट्या भावंडांना कोण सांभाळणार पोटजाळण्यासाठी मोलमजुरी आईबापाला सोडता येत नाही. त्यांना जाबेच लागेल. या सर्व परिस्थितीचा गंभीर विचार होणे आवश्यक आहे. एका मर्यादेपलिकडे बहुतेकांना शिक्षण घेता येत नाही. शिंकू पाहणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या मनाला हळुवार फुंकर घातली म्हणजे ते बोलते होतात.<br

नोकरी की शिक्षण हा पेच:

 आदिवासी विद्यार्थी पुढे शिकू इच्छितो उच्च शिक्षण घेऊ इच्छितो. पण कांहींच्या पुढे नोकरी की शिक्षण हा फार मोठा पेत्र निर्माण झालेला आहे. पहिल्यांदा शिक्षण असा फौल कमी पडतो. परिस्थितीमुळे नोकरी लक्ष्य आहे, हाही परिस्थितीचाच परिषकि पुन्हा शिक्षणासाठी कळ सोसली पाहिजे इतपत जाणीव नाही, नामदार गोखले, आगरकर, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र माहीत नाही. अशा कथाही त्यांना सांगणारे नाहीत. शासनाकडून दिल्या जाणान्या शिष्यवृत्या आणि विद्यावेतने संपूर्ण कुटुंबाला उभे करू शकत नाहीत. कुटुंबाच्या दुःख्यात तर शिक्षण घेतांना सहभागी व्हावेच लागते. ते दुःख नजरेआड कसे करता येईल या परिस्थितीत डी. एड. न होता केवळ ३०० रुपयांवर सरकारच्या मेहरवानीने मिळणारी शिक्षकाची नोकरी स्वीकारावीच लागते. आपण कमावते झाल्याचे समाधान मिळते पण शिक्षणाला कायमचा रामराम ठोकूनच. हाताशी आलेली पदवी सोडून एस. बास.बी.ए., बी. कॉम पर्यंत झालेले शिक्षण सोडून याच नोकरीच्या आकर्षणासाठी आय.टी.आय. चा साधा मिळेल तो ट्रेड ही मुले स्वीकारतात. या सगळ्यातून हाती फारसे लागत नाही. स्वतःला सावरणारे, जीवनाला उभारी देणारे तत्वज्ञानही लथा शिक्षणाअभावी दुरावलेले असते.

शिक्षण घेतांनाही हेळसांडच :

 शिक्षण घेतांनाही अनंत अडचणी आहेत. बह्या, पुस्तके, मिळत नाहीत,चांगले शिकविले जात नाही शिकविणारे उपलब्ध होत नाहीत. गणित, इंग्रजी,

१०६