पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आदिवासी विद्यार्थ्यांशी झालेल्या भेटीगाठीतून बहुतांशी सर्वांची समान परिस्थिती आहे. थोड्याफार फरकाने सगळेच भरडले गेलेले आहेत आणि जात आहेत हेच खरे. वर्षाकाठी ३,५८० रुपयांच्यावर त्यांचा पगार जात नाही. त्यांच्या कुटुंबात खाणाच्या माणसांची संख्या कमावणाऱ्यापेक्षा कितीतरी अधिक आहे. ४-५ पासून ३०-८० पर्यंत माणसे एका कुटुंबात आहेत. अर्थात ३४ माणसांचे कुटुंब म्हणजे एकत्र कुटुंब आहे. साधारणपणे कुटुंबात २-२ बायका आढळतात. त्यातही पुन्हा धरसोडीचे प्रकार आहेतच. त्यामुळे मुलांची संख्या अधिक झालेली दिसते. मागच्या पिढीचे शिक्षण प्रौढ शिक्षणाच्या फार पुढे गेलेच नाही. म्हणजे दुसरी, तिसरी, चौथीच्या आतच आटोपलेले आहे. मात्र आतांच्या पिढीतील .विद्यार्थ्यांचे वडील, भाऊ, बहीणी निदान ६वी, ७वी, ११वी पास नापास आहेत. तेच या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक आधार बनले आहेत.

शिक्षणापासून वंचित राहण्याची कारणमीमांसा :

 आदिवासी विद्यार्थ्यांची शिक्षणापासून वंचित राहण्याची आणि शिक्षण न घेण्याची अनेक कारणे दिसून येतात. प्रत्येकाची कारणे वेगवेगळी आहेत. याला केवळ प्रतिकूल आर्थिक परिस्थिती कारणीभूत नाही, ती बहुसंख्याची निश्चित बिकट आहे यात वाद नाहीच. भातशेती म्हणजे न पिकणाऱ्या खाचरांना पिकवीत : बसावयाचा उद्योग आहे. तिथेही मनुष्यबळ कमी पडतेच असे म्हणतात, की सीतामाईला रावण पळवून नेत असतांना तिची सुटका केली नाही म्हणून या कोकण भूमीला तिने जळजळीत शाप दिला भाजल्याशिवाय ही जमीन पिकणार नाही आणि शेतकरी भाजला जातो तरीही ही भूमी भाजूनही पिकत नाही अशी स्थिती आहे. शेती ही स्थावर मालमत्ता सोडून अन्यत्र शहरात जाऊन राहता येत नाही. परिस्थिती अशी आहे की शेती सोडली तर आहे तेही उत्पन्न बुडेल आणि तिथे शेतीवर बसून राहिले तर पोट भरत नाही. मुलाबाळांना उघडेनागडे ठेवून शेतीतच पुन्हा मरावे लागते आणि शिकण्याचा गंध तेथपर्यंत पोहोचत नाही. शिकविणेही परवडत नाही कारण गुरे कोण राखील आणि पोरवडा कोण सांभाळल असा प्रश्न असतो. दारिद्रय आणि गरिबी ही वस्तुस्थिती आहे शिवाय तांत्रिक अडचणीही आहेत. गावात शाळा नाहीत, जवळपास शाळा नाहीत, बाहेरगावी जाऊन शिक्षण घेणे परवडत नाही आपल्याहून धाकट्या भावंडांना सांभाळावे