पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाही. ओरड करण्याचीही गरज पडणार नाही. मात्र त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत सूक्ष्म निरीक्षण करणे आवश्यक आहे.

रोगनिदानंतर उपचार:

 रोगनिदान झालं म्हणजे हमखास यशस्वी उपाययोजनाही करता येते. परिस्थितीचे सम्यक व मर्मग्राही अवलोकन करता आल्यास त्यावर रामवाण उपाय व तोडगाही सापडतो यास्तव, प्रस्तुत लेखकाने आदिवासी विद्यार्थीजीवन जाणून घेण्याचा प्रत्यक्षाच्या आधारे प्रयत्न केलेला आहे. त्याआधारे काढलेले निष्कर्षे व सुचविलेले उपाय फलदायी झाल्याशिवाय राहणार नाहीत याची खात्री वाटते, आजच्या शिक्षणामधून स्वाभिमान आणि स्वालंबन या दोन गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत याचे दुःख वाटते. आमची शिक्षणपध्दती आणि योजना कमी पडतात. राबविण्यात काही कसूर असेलही तथापि भुकेलेल्यांना मासे देऊ नयेत तर मासे पकडण्याचे जाळे द्यावे असे नुसते बोलले जाते. पण प्रत्यक्षात तसे प्रयत्न होत नाहीत आणि कोणी करू धजल्यास करणाऱ्यांच्या माथी अपयश आणि निराशाही येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

 ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर त्यात आदिवासींच्या आठ जमाती आढळतात. महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, कोकणा, वारली, ठाकूर, धोडी, कातकरी, त्यातही पुन्हा क ठाकूर, म ठाकूर, अशा उपजमाती आहेत. कोकणा या जमाती थोड्या फार पुढारलेल्या असून कातकरी, भिल्ल, गोंड या जमाती अद्यापही शिक्षण आणि संस्कारापासून वंचित आहेत. या जमातींना शिक्षणाचे महत्त्व प्रकारे पटवून देण्याची आवश्यकता आहे. पण आमचे हे प्रयत्नही 'कुचकामी आणि तकलादू ठरत आहेत. अशा या वातावरणातील आमच्या आदिवासी विद्यार्थी बंधुभगिनींचे जीवन फार वेगळे आहे असे मानता येत नाही. वाल्याचा बाल्मिकी झाला आणि मानवी गुरू भेटला नाही, तरी मानीव गुरुपासून विद्या संपादन करणारा एकलब्ध झाला तरी अजूनही सगळ्यांना हे साध्य झालेले

नाही ही आमची खंत आहे.

१०४