पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आदिवासी विद्यार्थ्यांच्या उत्कर्षाची नवी दिशा


 सर्वांच्या वाट्याला सारखेच विद्यार्थी जीवन येते असे नाही. महाराष्ट्रात तरी सर्वत्र स्थलकालपरिस्थितीनुसार विद्यार्थिजीवनामध्ये विशेष लक्षणीय जीवन एका सरधोपट मापाने मोजणे म्हणजे त्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर फार मोठा अन्याय केल्यासारखेच आहे.
आदिवासी भागातील विध्यार्थ्याच्या सहवासात काही काळ घालविल्यानंतर कोणत्याही विचारी माणसाला शहरी, ग्रामीण, नागरी, अनागरी जीवनातील तफावतीची तीव्र जाणीव झाल्याखेरीज राहणार नाही. म्हणूनच पुष्कळदा कोणत्याही प्रश्नाच्या संदर्भात विचार करीत असतांना स्थल, काल परिस्थिती संदर्भ सोडून विचार करणे गैर वाटते. येथे प्रश्न गुणवत्ता आणि दर्जेदार सूचनांचा नसून, खरा प्रश्न आहे तो साधन सामग्री व सोयीसुविधांच्या असमान उपलब्धतेचा.

तळमळीच्या कार्यकर्त्यांची गरज :

 चर्चा, परिसंवाद, आणि व्याख्यानमाला यातून ग्रामीण सुधारणा मोहीमेबद्दल विविध प्रकल्प आणि उपक्रमांबद्दल बरेच बोलले जाते. काही प्रमाणात ते राबविलेही जाते. क्वचित यशस्वीपणे अंमलबजावणीही झाल्याचे आढळते. पण तेवढ्यावरून ग्रामसुधारणा पूर्ती झाली आणि शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघर पोहोचली आहे ही कल्पना करणे निखालस चुकीचे ठरेल.

 सर्वच क्षेत्रात आपल्या कामांची गती विलक्षण झपाट्याने वाढण्याची आवश्यकता आहे. सध्याची आपली एकूण कामाची गती आणि खालावलेली परिस्थिती यांचा मेळ बसत नाही. अपेक्षेपेक्षा खूपच मंदगती आहे. खप्या तळमळीच्या कार्यकर्त्यांची कमालीची उणीव आता सर्वच क्षेत्रात विशेष तीव्रतेने जाणवत आहे. म्हणूनच पुष्कळसे प्रश्न भिजत लोंबकळत पडलेले आहेत. आता खरी गरज आहे ती योजनेपेक्षा प्रकल्प राबविणाज्यांची. सगळे हात एका पोटतिडकीने आणि तळमळीने कामाला लागले पाहिजेत, म्हणजे भग उघड्या डोळपांनी दिसणाऱ्या गंभीर उणीवांचा आणि अडचणींचा पाढा वाचला जाणार

१०३