Jump to content

पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महाराष्ट्रीयन मुलांमध्येही भरपूर उदासीनता दिसते. या परीक्षांमध्ये महाराष्ट्रीय मुले मागे असल्याबद्दल खंतही व्यक्त होते. पण प्रत्यक्षात शहरी काय किंवा बा मुलांसाठी प्रशिक्षण सोयी फारशा उपलब्ध नाहीतच.

 वनवासी मुलांना असलेली शिष्यवृत्ती वेळेवर मिळण्यासाठी लागणाऱ्या. कागदपत्रांची माहिती विद्यार्थ्यांना मिळण्याची व्यवस्था व्हावी आगावू रक्कम अकौंटिंगच्या त्रासांकरिता काही प्राचार्य घेतच नाहीत, ती घेऊन लगेच वितरित केली पाहिजे. राष्ट्रीयकृत बँकेत विद्यार्थ्याचे खाते उघडणे, बँच मॅनेजरला कटकटीचे वाटते. कारण खात्यात रक्कम शिल्लक राहात नाही. ही बँकेची गैरसोय, तरी सर्व बँकाना पुन्हा खास सूचना काढून आदिवासी मुलांच्या खातेपुस्तिका आवर्जून काढून त्यातच शिष्यवृत्तीचे धनादेश भरले जावेत.

 या विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या अनुत्तरीत आहेत. कागदोपत्री सोयी अनेक केलेल्या आहेत. पण तेवढ्या करून भागणार नाहीत. त्या सोयी आणण्यासाठी मनापासून व नेटाने प्रयत्न होणे आवश्यक आहे. तसे प्रयत्न झाले

तरच हा वर्ग मुख्य प्रवाहात येण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होऊ शकेल.

१०२