पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांना जेथे नोकरी करू इच्छितात, तेथील कार्यालयात बदलून मिळण्याबाबतची तशी सुविधा असावी.

व्यक्तिगत पातळीवरील खेळ अॅथलेटीक्स उदा., मॅरेथॉन, रनिंग, लांब उड़ी,

उंच उडी, गोळा फेक अशा खेळांमध्ये त्यांना
विशेष गती जन्मजात असते कारण
निसर्गाशी सुसंवाद साधून उन, वारा,
पाऊस, थंडी पचविण्याची सवय त्यांना
असते. फक्त या काटक विद्यार्थ्यांना
व्यवस्थित मार्गदर्शन मिळावे. त्यासाठी खास
कोच नेमून कार्यशाळा, शिबिरे, क्रीडा सामने
भरवायला हवेत. जे क्रीडा क्षेत्राचे तेच, '
सांस्कृतिक क्षेत्रातही आढळते. न दमता
रात्रभर नाच करण्याची क्षमता वनवासी
विद्यार्थ्यांमध्ये आहे. रात्रभर तारपा तोच फुंकू
शकतो, थाळगान कथा लावू शकतो आणि
बोहाड्यातील सोंग नाचविणे, ढोल नाच
करणे, त्याच्या नित्याच्या सवयीचे आहे.
जाणकारांकडून कलेचे मार्गदर्शन मिळण्याची

(महाराष्ट्रातील आदिवासी पुरुष खेळाडू मलखम्भ प्रदर्शन करतांना )

व्यवस्था केल्यास विविध ललित कलांमध्ये वनवासी विद्यार्थी स्वचित महाविद्यालयात वरच्या क्रमांकाने चमक दाखवू शकतो. उदा. चित्रकला, अभिनय, गाणे, भजन याची त्याला मुळात आवड आहे. त्यागुणांचे संगोपन प्रशिक्षण महाविद्यालयातून करण्याची व्यवस्था व्हावी, मूर्तीकलेचीही उपजत आवड असलेले विद्यार्थी, मूर्ती कला सोडून पोलिसमध्ये भरती होतात कारण मूर्ती कलेचे शिक्षण कुठे उपलब्ध होईल, हे त्या पाड्यामध्ये त्याला कळण्याची व्यवस्था नाही. तेव्हा कला क्रीडा क्षेत्रात लक्ष घालावे.


 एखादा बनवासी विद्यार्थी लांबच्या गावाहून आलेला मुंबईसारख्या परक्या

ठिकाणी आजारी पडला, तर त्याला वसतिगृहामार्फत अधिकृत डॉक्टरकडून

१००