पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग ७.


स्वशिक्षण.


 सर्व शक्ति सारख्या प्रमाणानें, व संगतवार ज्याच्या योगानें वाढतील त्याला शिक्षण ह्मणतात. शिक्षण बालपणीच सांगोपन- खोलींत सुरू होतें, शाळेंत तें पुढें चालू होतें, परंतु तें तेथेंच संपत नाहीं. आपली इच्छा असो वा नसो तें जन्मपर्यंत चालूच असतें. तेव्हां प्रश्न एवढाच उरला, आयुष्याच्या उत्तरार्धात आपण जें ज्ञान मिळवितों तें शहाणपणानें निवडून मिळवितों कीं, सहजासहजी मिळतें तेंच घेतों. गिबन ह्मणतो- “प्रत्येक माणसास दोन तऱ्हेचीं शिक्षण मिळतात; एक तो लोकांकडून मिळवितो आणि दुसरें स्वतः मिळवितो, व हें पहिल्यापेक्षां अधिक महत्वाचें असतें.”
 मनुष्य इतरांपासून जें ज्ञान मिळवितो त्यापेक्षां स्वतः मिळ- विलेलें ज्ञान त्यास जास्त उपयोगी पडतें. लॉक ह्मणतो -- “गु- रूच्या नियंत्रणाखालीं व अमलाखालीं राहून कोणी शास्त्रांत प्रवीण झाला नाहीं; किंवा ज्ञानांत कोणाचीही फारशी गति झालेली नाहीं.” कितीही इच्छा असली तरी तुला आपलें हृदय रिक्त, शुद्ध व साजरें ठेवितां येणार नाहीं. ह्मणून बऱ्या विचारांच्या किंवा वाईट विचारांच्या वसतीसाठीं तें तयार करावें हा प्रश्न रहातो. ज्यांनी शाळेत नांव कमाविलें नाहीं, त्यांना वाईट वाटण्याचें प्रयोजन नाहीं. मोठी बुद्धि पहिल्यानेंच पक्वतेस येते असें नव्हे. नावारूपास येण्याची मेहनत घेतली नसली तरी तुह्मी निराश व्हावें असें मी ह्मणणार नाहीं; मात्र त्याबद्दल तुझांला लाज